महिला असो वा पुरूष चेहऱ्यावर डाग असेल तर चेहरा चांगला दिसत नाही. तसेच महिलांच्या चेहऱ्यावर नको असलेले केस असतील तर सौंदर्यात कमतरता जाणवते. हे नको असलेले केस दूर करण्यासाठी महिला वेगवेगळ्या क्रीमचा आणि ट्रीटमेंटचा आधार घेतात. पण त्याचे त्यांना दुष्परिणामही भोगावे लागतात.
चेहऱ्यावर केस असण्याची वेगवेगळी कारणे असतात. जसे की, स्ट्रेस, पीसीओडी आणि हाय टेस्टोस्टेरॉन. जर तुम्हीही चेहऱ्यावरील केसांमुळे त्रासलेल्या असाल तर आज आम्ही तुम्हाला काही असे उपाय सांगणार आहोत, ज्यांच्या मदतीने केवळ चेहऱ्यावरील नको असलेले केसच दूर होणार नाही तर चेहऱ्यावर एक रंगतही येईल.
चारोळीचा वापर आपण वेगवेगळ्या मिठाईमध्ये करण्यात आल्याचं आपण नेहमी बघतो. फॅटी अॅसिड आणि प्रोटीन भरपूर असलेली चारोळी आरोग्यासाठी फार फायदेशीर असते. पण याचा वापर तुम्ही चेहऱ्यावरील नको असलेले केस दूर करण्यासाठी, पुरळ आणि पिंपल्स दूर करण्यासाठीही करू शकता. चला जाणून घेऊ चारोळीचा फेसपॅक कसा तयार करायचा.
१) चारोळीचा फेसपॅक तयार करण्यासाठी चारोळीचे १० ते १२ दाणे रात्री दुधात भिजवून ठेवा. सकाळी चारोळी फुगल्यावर त्याची बारीक पेस्ट तयार करा. तुमचा पॅक तयार आहे. आता हा पॅक चेहऱ्यावर लावा. काही वेळाने चेहरा हलक्या हाताने स्क्रब करा. याने त्वचेवरील नको असलेले केस दूर होतील आणि चेहऱ्यावर रंगतही येईल. हा उपाय आठवड्यातून दोनदा करू शकता.
२) सर्वातआधी उडीद डाळीचं पावडर तयार करा. आता त्यात चिमुटभर हळदी आणि गरजेनुसार पाणी टाकून मिश्रण तयार करा. ही पेस्ट चेहऱ्यावर लावून सुकू द्या. काही वेळाने हलक्या हाताने चेहऱ्यावर स्क्रब करा. याने चेहऱ्यावरील नको असलेले केस दूर होती आणि त्वचा उजळेल सुद्धा.