चांगली झोप म्हणजे गंभीर आजारांपासून बचाव
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2016 08:04 IST
परिपूर्ण झोप आणि व्यायाम यामुळे गंभीर आजारांचा धोका कमी होतो. असे एका नवीन संशोधनात स्पष्ट झाले आहे.
चांगली झोप म्हणजे गंभीर आजारांपासून बचाव
परिपूर्ण झोप आणि व्यायाम यामुळे गंभीर आजारांचा धोका कमी होतो. असे एका नवीन संशोधनात स्पष्ट झाले आहे.न्यूयॉर्क विद्यापीठातील संशोधकांनी सांगितले की, रोज सात ते आठ तास झोप आणि आठवड्यातून तीन ते सहावेळा अर्धा तास व्यायाम केल्यास आजारांचा धोका कमी होतो. मात्र खूपच जास्त झोपेमुळे हा धोका वाढू शकतो. संशोधनानुसार, गंभीर आजाराचा धोका 7-8 तास झोप घेणा-यांच्या तुलनेत 25 टक्क्यांनी कमी दिसून आला.मात्र यापेक्षा जास्त झोप घेणा-यांमध्ये गंभीर आजारचा धोका 146 टक्क्यांनी वाढलेला दिसून आला आहे. तर 7 तासापेक्षा कमी झोप घेणा-यांना 22 टक्के धोका असतो. संशोधकांनी 2004-2013 या दहा वर्षांतील सर्वेक्षणानुसार आरोग्य, जीवनशैली यांचे तांत्रिक पद्धतीने विश्लेषण केले आहे.