वर्किंग वुमन्ससाठी आपल्या त्वचेची काळजी घेणं फार अवघड असतं. कामाच्या व्यापामध्ये स्वतःच्या त्वचेची काळजी घेण्यासाठी वेळ काढणं फार अवघड होतं. यामुळे नेहमी त्यांना त्वचेशी निगडीत समस्यांचा सामना करावा लागतो. तसेच त्यांचा लूकही डल दिसू लागतो. असं होऊ नये म्हणून आज आम्ही काही खास टिप्स सांगणार आहोत. ज्या वर्किंग वुमन्सना आपल्या त्वचेची काळजी घेण्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतील.
डिप क्लिनिंग
चेहरा आठवड्यातून कमीत कमी दोन वेळा तरी डिप क्लीन करायला विसरू नका. त्यासाठी स्क्रबचा वापर करा. त्याचबरोबर महिन्यामध्ये एकदा फेशिअल नक्की करू घ्या. यामुळे तुमची स्किन रिलॅक्स होण्यासोबतच पोर्स क्लीन होण्यासही मदत होईल. यामुळे पिंपल्सची समस्या दूर होईल.
फेस मास्क शीट्स
फेस मास्क शीट्सचा सर्वात जास्त फायदा हा आहे की, हे कमीत कमी वेळामध्ये स्किनला नरिशमेंट देतात. बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे मास्क उपलब्ध आहेत. यांपैकी तुमच्या स्किन टाइपनुसार, फेस मास्क निवडा आणि तो 10 मिनिटांपर्यंत लावून ठेवा. याचा दररोज वापर केल्याने तुमच्या चेहऱ्याचा त्वचेवर ग्लो येईल.
फेशिअल स्प्रे
बाजारात फेशिअल स्प्रे अगदी सहज मिळतात. हे फेस मॉयश्चराइज्ड ठेवण्यासोबतच स्किन हायड्रेट ठेवण्यासाठीही मदत करतं. ज्यामुळे सुरकुत्या आणि पॅचेसची समस्या उद्भवत नाही.
वर्किंग वुमन असाल तर ऑफिसमध्ये काम करताना हातांचा वापर करावा लागतो. कॉम्प्युटरवर काम करताना हातांचा वापर सतत करावा लागतो. अशावेळी हातांच्या त्वचेचीही काळजी घेणं आवश्यक असतं. त्यामुळे आपल्या सोबत नेहमी हॅन्ड क्रिम कॅरी करा आणि दिवसातून तीन ते चार वेळा हातांना क्रिम लावा.
लिप बाम
लिप बाम लिप्सना फक्त कलर देत नाही, तर ते हायड्रेट आणि सॉफ्ट करण्यासाठी मदत करते. यामुळे जेव्हा तुम्ही लिपस्टिक अप्लाय कराल तेव्हा ती पॅची वाटणार नाही.
(टिप : वरील सर्व उपाय घरगुती आहेत आणि केवळ माहिती म्हणून आम्ही हे वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते त्यामुळे सर्वच उपाय सर्वांच्याच त्वचेसाठी फायदेशीर असतील असं नाही किंवा असा दावाही आम्ही करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल.)