शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

चेहऱ्याचा तेलकटपणा दूर करण्यासाठी करा हे घरगुती उपाय

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2018 15:33 IST

आम्ही तुमच्यासाठी काही खास टीप्स घेऊन आलो आहोत. या घरगुती टीप्सच्या माध्यामातून तुम्ही चेहऱ्यावरचा तेलकटपणा सहज दूर करू शकता.

(Image Credit : stylepresso.com)

त्वचेमध्ये तेल ग्रंथी जास्त असतात. त्यामुळे काही लोकांची त्वचा तेलकट होते. तेलकट त्वचेची सामान्य त्वचेपेक्षा अधिक काळजी घ्यावी लागते. अनेकांना या सततच्या तेलकटपणापासून सुटका हवी असते. त्यासाठी आम्ही तुमच्यासाठी काही खास टीप्स घेऊन आलो आहोत. या घरगुती टीप्सच्या माध्यामातून तुम्ही चेहऱ्यावरचा तेलकटपणा सहज दूर करू शकता.

- त्वचा ऑईल फ्रि करण्यासाठी नैसर्गिक गुण असलेल्या फेसवॉशचा वापर करा. कधीही ग्लीसरीन असलेल्या साबणाचा वापर करा. 

- आठवड्यातूल एकडा लाइट स्क्रबचा वापर करा कारण तेलकट त्वचेची क्लीजिंग गरजेची असते. मसाज केल्याने धूळ, माती, मेकअप निघून जातं. त्यामुळे त्वचेची छिद्रे साफ होतात. याप्रकारे तुम्ही ब्लॅक हेटसारख्या समस्येपासून सुटका मिळवू शकता. 

- चेहऱ्यावर ग्लो हवा असेल तर बेसणाने चेहरा धुवा. 

- कडूलिंबाच्या पाने उकळून गाळून घ्या. हे पाणी चेहऱ्यावर लावा. 

- चंदन पावडर आणि पपईचा पॅक तयार करुन चेपऱ्यावर लावा. 

- जेव्हाही घराबाहेर पडाल चेहऱ्याला कॉम्पॅक्ट पावडर लावून निघा. यामुळे तुमच्या चेहऱ्याचं धुळ-मातपासून संरक्षण होईल. 

- काकडीच्या रसात काही थेंब लिंबाचा रस टाकून ते 15 मिनिटांसाठी चेहऱ्यावर लावून ठेवा. त्यानंतर थंड पाण्याने चेहरा स्वच्छ करा. 

- चेहऱ्यावर अंड्याचा पांढरा भाग लावा आणि थोड्या वेळाने ते कोरडं झाल्यावर बेसनाच्या पीठाने ते स्वच्छ करा. 

- चेहऱ्याचा तेलकटपणा कमी करण्यासाठी तांदळाच्या पीठात पुदीन्याचा अर्क किंवा गुलाबजल मिश्रित करुन 10 मिनिटे लावून ठेवा. काही वेळाने पाण्याले चेहरा स्वच्छ करा. 

- सफरचंद आणि लिंबाचा सारख्या प्रमाणात मिश्रित करा आणि हा पॅक चेहऱ्यावर 15 ते 20 मिनिटे लावा. यामुळे तुमचा चेहरा ग्लो करेल. 

- रात्री झोपण्यापूर्वी आधी त्वचा स्वच्छ करा. याने चेहऱ्यावर पिंपल्स ब्लॅक हेड्स होणार नाहीत. 

- तेलकट त्वचा असलेल्या लोकांनी तणावमुक्त रहायला हवं. त्यामुळे चेहऱ्यावर प्रभाव पडतो. 

- त्वचेवरील तेलकटपणा कमी करण्यासाठी तेल-मसालेदार पदार्थ सेवन करु नका. 

- तेल ग्रंथी संतुलित करण्यासाठी फायबर युक्त पदार्थांचं सेवन करा. जेवणा सॅलडला सहभाग करा. 

- व्हिटॅमिन सी असलेल्या लिंबू, संत्रा आणि आवळा हे अधिक प्रमाणात खा. 

- टोमॅटो तेलकट त्वचेवर एस्ट्रिंजेटसारखं काम करतं. त्यामुळे टोमॅटोचा रस कापसाच्या मदतीने चेहऱ्यावर लावा. याने एक्स्ट्रा ऑईल बाहेर येईल. 

- आठवड्यातून एकदा घरगुती फेस मास्क लावा. चंदन पावडर, मुलतानी माती किंवा चिमुटभर हळद नारळाच्या पाण्यात मिश्रित करुन पेस्ट करा आणि 15 ते 20 मिनिटांसाठी चेपऱ्यावर लावा. ते कोरडं झाल्यावर पाण्याने चेहरा स्वच्छ करा.

टॅग्स :Beauty Tipsब्यूटी टिप्सHealth Tipsहेल्थ टिप्स