BEAUTY : रशियन महिलांचे हे आहे ब्यूटी सीक्रेट !
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2018 12:04 IST
रशियन महिला आपली त्वचा आणि केसांच्या सौंदर्यासाठी आपल्या डायटमध्ये काही हेल्दी फूडचा समावेश करतात. जाणून घेऊया त्यांच्या सौंदर्याचे रहस्य...
BEAUTY : रशियन महिलांचे हे आहे ब्यूटी सीक्रेट !
रशियन महिला त्यांच्या सौंदर्याने ओळखल्या जातात. रशियाच्या सेलिब्रिटीदेखील तेवढ्याच सुंदर आहेत. विशेष म्हणजे तेथील जेनेटिक कं डीशन आणि भोगोलिक परिस्थिती त्यांच्या सौंदर्यामागे असल्याचे समजते. मात्र काही घरगुती उपायदेखील त्यांच्या सौंदर्यासाठी कारणीभूत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. रशियन महिला आपली त्वचा आणि केसांच्या सौंदर्यासाठी आपल्या डायटमध्ये काही हेल्दी फूडचा समावेश करतात. जाणून घेऊया त्यांच्या सौंदर्याचे रहस्य... * रशियन महिला त्वचेचे फेयरनेस वाढविण्यासाठी बटाट्याची पेस्ट, दूध आणि बदामाचे तेल एकत्र करू न तयार झालेल्या पॅकचा वापर करतात. * रशियन महिला आपली त्वचा गोरी होण्यासाठी दही आणि मधाचे फेस पॅक लावतात. * त्या त्वचेची शायनिंग वाढविण्यासाठी रोज ‘कॅमोमाइल टी’चे सेवन करतात.* त्या वजन नियंत्रित ठेऊन स्लिम आणि फिट राहण्यासाठी रोज मिक्स व्हेजिटेबल सूपचे सेवन करतात. यात कॅलरीजचे प्रमाण कमी असते. शिवाय पत्ताकोबी आणि पालकसारख्या भाज्यांचाही त्यांच्या डायटमध्ये समावेश असतो. * रशियन महिला त्वचेचा ड्रायनेस दूर होण्यासाठी आणि ग्लो वाढविण्यासाठी अंड्यांच्या योकमध्ये आॅलिव्ह आॅइल मिक्स करुन त्वचेवर लावतात. यामुळे त्वचेच्या समस्या दूर होऊन त्यांच्या सौंदर्यात भर पडते. * रशियन महिला केसांच्या सौंदर्यासाठी रशियन महिला कच्ची केळी मश करुन लावतात. यामुळे केसांच्या समस्या दूर होऊन केसांची शायनिंगदेखील वाढते. Also Read : Beauty : का एवढ्या सुंदर असतात ‘इराण’च्या महिला, जाणून घ्या त्यांचे सौंदर्याचे रहस्य ! : WOW ! ‘या’ देशाच्या महिला आहेत जगात सर्वात सुंदर !