ऐश्वर्या बनणार दुस-यांदा आई
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2016 20:39 IST
बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन दुस-यांना आई बनणार आहे. यामुळेच तिने मीडियापासून चारहात लांब राहणे पसंत केले आहे.
ऐश्वर्या बनणार दुस-यांदा आई
बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन दुस-यांना आई बनणार आहे. यामुळेच तिने मीडियापासून चारहात लांब राहणे पसंत केले आहे. विशेष म्हणजे आपला ‘बेबी बंप’ लपवण्यासाठी ऐश्वर्या सध्या खूप प्रयत्न करताना दिसतेय. मी़डियाच्या माहितीनुसार, नुकत्याच झालेल्या ‘हाऊसफूल ३’च्या प्रीमियरमध्येही ऐश्वर्या बेबी बंप लपवण्याचा प्रयत्न करताना दिसली.यावेळी जेव्हा सर्व सिनेकलाकार मीडियाच्या कॅमेºयासमोर पोज देण्यासाठी आले तेव्हा यामध्ये ऐश्वर्या राय तिथे नव्हती. ती मीडियाच्या कॅमेºयापासून स्वत:ला लपविण्याचा प्रयत्न करत होती. परंतु, तरीही काही फोटोग्राफर्सनी तिचे फोटो काढलेच. ऐश्वर्याने एक मोठी हॅन्डबॅग खांद्यावर टाकलेली होती. कॅमेºयांचे फ्लॅश पडताच ऐश्वर्याने आपली बॅग पोटासमोर धरली, यामुळे तर चर्चेला आणखीनच उधाण आले. पहिली मुलगी आराध्याला २०११ साली अॅशने दिला होता. आराध्या आता ५ वर्षांची झालीय आणि ऐश्वर्या आता ४२ वर्षांची आहे.