पानकोबीच्या ज्यूसचा फायदा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2016 17:57 IST
कोबीचा ज्यूस पिण्याचे हे आहेत लाभ
पानकोबीच्या ज्यूसचा फायदा
भाजी किंवा सूपसाठीही कोबीचा उपयोग केला जातो. वजन कमी करण्यासाठी कोबी महत्वाची भूमिका बजावते. कोबीत व्हीटॅमिन जास्त प्रमाणात आहे. अँटी-आॅक्सीडेंट आणि फायटोकेमिकल्स असतात. हे आरोग्यासाठी फायदेशीर असते.कोबीचा ज्यूस पिण्याचे हे आहेत लाभ1. कोबीचा ज्यूस सेवन केल्याने अल्सर होण्याचा धोका कमी असतो.2. ज्यांना कॅन्सरचा धोका आहे. त्यांना कोबीचा ज्यूस अधिक लाभदायक आहे. कोबीतील सल्फोराफेनमुळे हे शक्य होते.3. कोबीचा ज्यूस मोतीबिंदू होण्यापासून रोखण्यास व डोळ्यांच्या समस्या दूर होण्यास मदत होते.4. त्वचेसाठी कोबीचा ज्यूस खूप लाभदायक आहे. त्वचा संदर्भात ज्या काही अनेक समस्या असतील त्या दूर होण्यास मदत होते. व्हीटॅमिन अधिक असल्याने त्वचा रोग परसण्यास मदत होते.5. दररोज कोबीचा ज्यूस सेवन केल्याने प्रतिकार शक्ती अधिक वाढते. त्यामुळे अनेक आजारांना सहज तोंड देता येते.