शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

केसांमध्ये होतो तब्बल ६ प्रकारचा कोंडा, जाणून घ्या यावर उपाय!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2018 11:03 IST

काहींना या समस्येतून सुटका मिळत नाही. खरंतर कोंडा हा वेगवेगळ्या प्रकारचा असतो हे अनेकांना माहितच नसतं. जर कोंडा कशाप्रकारचा आहे हे जाणून घेऊन उपाय केले तर त्याचा अधिक फायदा होईल.

केसांमध्ये डॅंड्रफ म्हणजेच कोंडा होण्याची समस्या ही अलिकडे वेगाने वाढत आहे. अनेकजण हा कोंडा दूर करण्यासाठी वेगवेगळ्या उत्पादनांचा वापर करतात. काहींना याचा फायदाही होतो. पण काहींना या समस्येतून सुटका मिळत नाही. खरंतर कोंडा हा वेगवेगळ्या प्रकारचा असतो हे अनेकांना माहितच नसतं. जर कोंडा कशाप्रकारचा आहे हे जाणून घेऊन उपाय केले तर त्याचा अधिक फायदा होईल.  अनेकांना हे माहीत नसतं की, केसांमध्ये होणारा कोंडा हा ६ प्रकारचा असतो. हा कोंडा होण्याची कारणेही वेगवेगळी असतात आणि हा कोंडा दूर करण्यासाठी उपयाही वेगवेगळे करावे लागतात. चला जाणून घेऊ केसांमध्ये होणाऱ्या कोंड्याचे प्रकार....

१) ड्राय स्कीन डॅंड्रफ

जर डोक्याची त्वचा प्रमाणापेक्षा जास्त ड्राय असेल तर त्यावर होणारा कोंडाही कोरडा असतो. हा कोंडा केसांना हात लावताच गळायला सुरुवात होते. याची दोन मोठी कारणे असतात एकतर थंडीचे दिवस आणि केस वेळेवर स्वच्छ न करणे.

२) ऑयली स्कीन डॅंड्रफ

आपली त्वचा नैसर्गिकपणे तेलची उत्पत्ती करतं. पण तेल डोक्याच्या त्वचेवर प्रमाणापेक्षा जास्त असेल तर त्यानेही डॅंड्रफ होतो. हे तेल वाढण्याची अनेक कारणे असतात. अशाप्रकारचा डॅंड्रफ डोक्याच्या त्वचेला चिकटलेला असतो आणि सहजपणे निघतही नाही. 

३) फंगल डॅंड्रफ

जर इन्फेक्शनमुळे डॅंड्रफ झाला असेल तर त्याला फंगल डॅंड्रफ म्हटले जाते. जर डोक्याच्या त्वचेवर अधिक तेल असेल तर त्वचेची पीएच लेव्हल बिघडल्यास याप्रकारचा डॅंड्रफ होतो. हा डॅंड्रफ पिवळ्या रंगाचा असतो आणि याने डोक्यात खाज येते.

४) कॉस्मेटिक प्रॉडक्टमुळे होणारा डॅंड्रफ

केसांवर प्रमाणापेक्षा जास्त केमिकल युक्त उत्पादनं जसे हेअर स्प्रे, क्रीम इत्यादी वस्तूंचा वापर केल्यानेही डॅंड्रफ होतो. याप्रकारच्या डॅंड्रफमुळे केसगळतीही होते. 

५) सेबोरिक डर्मेटायटिस

हा एकप्रकारचा स्कीन प्रॉब्लेम आहे, ज्यामुळे डोक्यात, कानांजवळ आणि मानेजवळ वेगळ्याच प्रकारचा डॅंड्रफ येतो. हा डॅंड्रफ येण्याचं कारण तणाव आणि हार्मोन्समधील बदल हे आहे. 

६) सोरायसिस

ही सुद्धा त्वचेसंबंधी समस्या आहे. याने रोगप्रतिकारशक्तीवर प्रभाव पडतो. अशावेळी एक वेगळ्याच प्रकारचा डॅंड्रफ तयार होतो आणि हा डॅंड्रफ त्वचेवर चिकटलेला असतो. 

काय करता येईल उपाय?

तज्ज्ञांच्या सल्ल्याने योग्य तेल आणि शॅम्पूचा वापर करा. 

रोजच्या डाएटमध्ये झिंक, व्हिटॅमिन-बी आणि फॅटता समावेश करा. 

केसांवर कोणत्याही प्रकारच्या केमिकल युक्त उत्पादनांचा उपयोग करु नका.

केसांना वेळेवर ब्रश आणि वॉश करा.  

टॅग्स :Beauty Tipsब्यूटी टिप्सHealth Tipsहेल्थ टिप्स