शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

वर्ल्ड टूर फायनल्स बॅडमिंटन: सिंधू व समीर यांची बाद फेरीत धडक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2018 04:46 IST

ऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्या पी.व्ही. सिंधूने वर्ल्ड टूर फायनल्सच्या ‘अ’ गटातील लढतीत शुक्रवारी येथे सलग तिसरा विजय नोंदवत बाद फेरी गाठली.

ग्वांग्झू : ऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्या पी.व्ही. सिंधूने वर्ल्ड टूर फायनल्सच्या ‘अ’ गटातील लढतीत शुक्रवारी येथे सलग तिसरा विजय नोंदवत बाद फेरी गाठली. दुसरीकडे या स्पर्धेसाठी प्रथमच पात्र ठरलेल्या समीर वर्माने ‘ब’ गटात आपली अखेरची लढत जिंकत बाद फेरीत धडक मारली.सलग तिसऱ्या वर्षी स्पर्धेसाठी पात्र ठरलेल्या सिंधूने शुक्रवारी येथे जागतिक क्रमवारीत १२ व्या स्थानी असलेल्या बेवेन झांगचा एकतर्फी लढतीत २१-९, २१-१५ ने पराभव केला. गेल्या वर्षी स्पर्धेत उपविजेती ठरलेली सिंधू म्हणाली,‘मी सुरुवातीला २-६ ने पिछाडीवर होती, पण सूर गवसल्यानंतर सर्वकाही सुरळीत झाले.’ तिने इंडियन ओपनच्या अंतिम लढतीत या खेळाडूविरुद्ध पत्कराव्या लागलेल्या पराभवाची आठवण करताना म्हटले की,‘मी इंडियन ओपननंतर तिच्याविरुद्ध अनेक सामने खेळले. त्यामुळे या लढतीकडे मी एक नवी लढत म्हणून बघत होते. सलग तीन सामने जिंकल्याचा आनंद आहे. ही सकारात्मक बाब असून उपांत्य फेरीत चांगली कामगिरी करण्यास उत्सुक आहे.’दुसरीकडे, २४ वर्षीय समीरने कोर्टवर चपळता दाखविताना थायलंडच्या केंटाफोन वांगचारोनचा ४४ मिनिटांमध्ये २१-९, २१-१८ ने पराभव केला. समीरने जागतिक क्रमवारीत केंटो मोमताविरुद्ध पहिला सामना गमाविल्यानंतर शानदार पुनरागमन केले आणि सलग दोन सामने जिंकत उपांत्य फेरीत स्थान निश्चित केले. समीर म्हणाला,‘मी यापूर्वी त्याच्याविरुद्ध स्विस ओपनमध्ये खेळलो होतो. त्यामुळे त्याच्या खेळाची कल्पना होती. दुसºया गेममध्ये पिछाडीवर असताना प्रशिक्षकाच्या सल्ल्यानुसार धैर्य कायम राखले आणि आता उपांत्य फेरीत खेळण्यासाठी सज्ज आहे. स्पर्धेत प्रथमच खेळण्याचा आतापर्यंतचा अनुभव शानदार ठरला.’ (वृत्तसंस्था)

टॅग्स :PV Sindhuपी. व्ही. सिंधूBadmintonBadminton