शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

World Badminton Championships 2018: अवघ्या 31 मिनिटांत सायनाचे आव्हान संपुष्टात

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2018 13:11 IST

World Badminton Championships 2018: भारताच्या सायना नेहवालला जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत धक्कादायक पराभव पत्करावा लागला.

नांनजिंग (चीन) - भारताच्या सायना नेहवालला जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत धक्कादायक पराभव पत्करावा लागला. स्पनेच्या कॅरोलिन मरिनने अवघ्या 31 मिनिटांत सरळ गेममध्ये सायनावर विजय मिळवला. मरिनने ही लढत 21-6, 21-11 अशी जिंकली आणि उपांत्य फेरीत प्रवेश केला.

जागतिक स्पर्धेत 2015 मध्ये रौप्य आणि 2017 मध्ये कांस्यपदक जिंकणा-या सायनाकडून राष्ट्रकुल सुवर्णपदकानंतर येथे जेतेपदाच्या अपेक्षा होत्या. मात्र, मरिनविरूद्धच्या सामन्यात तिचा संघर्ष जाणवलाच नाही. मरिनने अगदी सहजपणे सायनाला नमवले. मरिनने जलद खेळ करताना 11-2 अशी आघाडी घेतली. सायनाने गेममध्ये टिकून राहण्याचा प्रयत्न मरिनच्या खेळासमोर अपयशी ठरला. मरिनने 12 मिनिटांत हा गेम 21-6 असा घेतला.

दुस-या गेममध्ये सायना सुरूवातीचे गुण घेतले, परंतु मरिनच्या झंझावातासमोर तिला फार काळ तग धरता आले नाही. मरिनने दमदार स्मॅशचा खेळ करताना 11-8 अशी आघाडी घेतली. मरिनने 19 मिनिटांत हाही गेम 21-11 असा जिंकून सायनाचे आव्हान संपुष्टात आणले.या पराभवानंतर सायना म्हणाली, अव्वल दर्जाच्या खेळाडूंविरूद्ध खेळताना सातत्यपूर्ण खेळ कसा करता येईल यावर मेहनत घ्यावी लागेल. सुपर सीरिज स्पर्धेत चांगली कामगिरी करता न आल्यामुळे मला अव्वल खेळाडूंविरूद्ध खेळण्याची संधी मिळालेली नाही. पुढील स्पर्धांच्या दृष्टीने मेहनतीची आवश्यकता आहे आणि मी त्यासाठी प्रयत्न करणार आहे. 

टॅग्स :Saina Nehwalसायना नेहवालBadmintonBadmintonSportsक्रीडा