शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

श्रीकांतचा फ्रेंच ओपनवर कब्जा, अंतिम लढतीत जपानच्या निशिमोटोवर केली मात

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2017 21:36 IST

भारताचा अव्वल बॅडमिंटनपटू किदम्बी श्रीकांतने फ्रेंच ओपन बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे.

पॅरिस - भारताचा अव्वल बॅडमिंटनपटू किदम्बी श्रीकांतने फ्रेंच ओपन बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे. आज झालेल्या पुरुष एकेरीच्या अंतिम लढतीत श्रीकांतने जपानच्या केंटा निशिमोटोवर 21-14, 21-13 अशी सरळ गेममध्ये मात केली.  श्रीकांतचे हे एकूण सहावे आणि यंदाच्या वर्षातील चौथे सुपर सिरिज विजेतेपद आहे. श्रीकांत आणि निशिमोटा यांच्यातील अंतिम लढत अवघी 34 मिनिटे चालली.  या अंतिम लढतीवर श्रीकांतने सुरुवातीपासूनच वर्चस्व राखले.  त्याने पहिल्या गेममध्ये जपानी बॅडमिंटनपटूने आव्हान परतवून लावत हा गेम 21-14 असा आरामात जिंकला आणि लढतीत 1-0 अशी आघाडी घेतली. त्यानंतर दुसऱ्या गेममध्येही प्रतिस्पर्धी खेळाडूला कोणतीही संधी न देता श्रीकांतने हा गेम 21-13 असा मोठ्या फरकाने जिंकत सामन्यासह विजेतेपदावर कब्जा केला. 

भारताचा अव्वल बॅडमिंटनपटू के. श्रीकांतने आपलाच सहकारी एच.एस. प्रणॉयला २-१ ने पराभूत करून फ्रेंच ओपन बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत धडक मारली. श्रीकांतला पहिल्या गेममध्ये त्याच्या मनासारखा खेळ करता आला नाही. सूर न गवसलेल्या श्रीकांतला पहिली गेम १४-२१ ने गमवावी लागली. पण दुस-या आणि तिस-या गेममध्ये उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून अनुक्रमे २१-१९ आणि २१-१८ असे गेम जिंकून प्रणॉयला पराभूत केले. ही लढत १ तास २ सेकंद चाली होती. या सत्रातील चौथे विजेतेपद जिंकण्यासाठी श्रीकांतची अंतिम फेरीत लढत जपानच्या केन्टा निशीमोटोविरुद्ध होईल. निशीमोटोने उपांत्य फेरीत डेन्मार्कच्या अ‍ॅन्ड्रेस अ‍ॅन्टोसेनला सरळ दोन सेटमध्ये २१-१७, २१-१५ असे पराभूत केले. 

टॅग्स :BadmintonBadmintonIndiaभारतKidambi Srikanthकिदम्बी श्रीकांत