शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

सिंधूनं केली पराभवाची परतफेड, कोरिया ओपन सुपर सीरिजवर कोरलं नाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2017 12:42 IST

ऑलिम्पिक रौप्यपदकविजेत्या पी. व्ही. सिंधूनं कोरिया ओपन सुपर सीरिज बॅडमिंटन स्पर्धा जिंकली आहे. अंतिम सामन्यात भारताच्या पी. व्ही. सिंधूने जपानची प्रतिस्पर्धी खेळाडू नोझोमी ओकुहाराचा 22-20, 11-21, 21-18  अशा फरकानं पराभव केला.  

सोल, दि. 17 : ऑलिम्पिक रौप्यपदकविजेत्या पी. व्ही. सिंधूनं कोरिया ओपन सुपर सीरिज बॅडमिंटन स्पर्धा जिंकली आहे. अंतिम सामन्यात भारताच्या 22 वर्षीय  पी. व्ही. सिंधूने जपानची प्रतिस्पर्धी खेळाडू नोझोमी ओकुहाराचा 22-20, 11-21, 21-18  अशा फरकानं पराभव केला.  सिंधूसाठी अंतिम सामना आव्हानात्मक होता. कारण पहिला सेट 22-20 अशा फरकानं जिंकल्यानंतर दुसऱ्या गेममध्ये नोझोमीनं दमदार पुनरागमन करत सिंधूचा 11-21 असा पराभव केला होता. दुसऱ्या गेममध्ये नोझोमीनं सिंधूला खेळात परतायला संधीच दिली नाही. एकवेळ हा सामना सिंधू गमावणार असे वाटत होत. पण निर्णायक आणि अंतिम गेममध्ये सिंधूनं चांगला खेळ केला. अंतिम गेममघ्ये नोझोमीनं तिला कडवा संघर्ष दिला. 

यापूर्वी नोझोमी ओकुहारानं विश्व चॅम्पियनशिपमध्ये सिंधूचा पराभव केला होता. ऑलिम्पिक कांस्यपदकविजेती ओकुहारा हिने जगातील दुस-या क्र्रमांकाची अकाने यामागुची हिचा २१-१७, २१-१८ ने पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली होती. पण कोरिया ओपन सुपर सीरिज बॅडमिंटन स्पर्धेतील अंतिम सामन्यात सिंधून नोझोमीचा पराभव करत हिशेब चुकता केला. 

जागतिक बॅडमिंटनमध्ये चौथ्या क्रमांकावर असलेल्या सिंधूनं गेल्या वर्षी चायना सुपर सिरिज जिंकली होती. सत्राच्या सुरुवातीलाच इडिया सुपर सिरिज आणि सय्यद मोदी ग्रांप्री किताबही तिने पटकाविला होता. उपांत्या सामन्यात सिंधूने चीनच्या ही बिंगजियाओ हिचा पराभव करीत कोरिया ओपन सुपर सीरिजच्या फायनलमध्ये धडक दिली होती. 

टॅग्स :PV Sindhuपी. व्ही. सिंधू