शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
2
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
3
फक्त आरोग्य विमा काढणे पुरेसे नाही? 'या' एका नियमामुळे तुमचा क्लेम रिजेक्ट होईल, खिशाला बसेल भुर्दंड
4
"टाटा समूहात जे सुरू आहे, ते पाहून..," रतन टाटांचे निकटवर्तीय नोशीर सूरावालांनी अखेर मौन सोडलं
5
पैसे कमावण्याची संधी? ५ मोठे आयपीओ बाजारात येणार; लेन्सकार्टसह 'या' कंपन्यांची लिस्टिंगची तयारी
6
खळबळजनक! सुसाट डिफेंडरची ५ वाहनांना जोरदार धडक; तिघांचा मृत्यू, ५ जण जखमी
7
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
8
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
9
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
10
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच
11
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
12
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, निफ्टी ७० अंकांच्या तेजीसह उघडला; मेटल-रियल्टी शेअर्समध्ये खरेदी
13
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
14
ऑफर्स, ऑनलाईन चॅट्स, फसवणुकीचं जाळं...; iPhone चं आमिष दाखवून लाखोंची फसवणूक
15
भयानक प्रकार! भाजप नेत्याने शेतकऱ्याला थारखाली चिरडले, वाचवायला आलेल्या मुलींचे कपडे फाडले
16
आधार कार्डापासून ते बॅंक अकाऊंट पर्यंत, १ नोव्हेंबरपासून बदलणार ‘हे’ ५ नियम; तुमच्या खिशावर थेट होणार परिणाम
17
आंतरराष्ट्रीय जुजित्सू खेळाडू रोहिणी कलम यांनी आयुष्य संपविले; एक फोन आला आणि ती खोलीत गेली...
18
८ मिनिटांत ८ अब्ज रुपयांचे दागिने चोरणारे चोर सापडले; पॅरिसच्या म्युझियममध्ये टाकलेला दरोडा
19
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
20
टॅरिफची धमकी मिळाल्याने थायलंड-कंबोडियात युद्धबंदी; ट्रम्प यांच्या आणखी एका मध्यस्थीला मिळाले यश

सिंधूला नमवून सायना उपांत्य फेरीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2018 22:06 IST

माजी नंबर वन ‘फुलराणी’सायना नेहवाल हिने शुक्रवारी आॅलिम्पिक रौप्य विजेती पी. व्ही. सिंधूवर विजय नोंदवीत इंडोनेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली.

जकार्ता: माजी नंबर वन ‘फुलराणी’सायना नेहवाल हिने शुक्रवारी आॅलिम्पिक रौप्य विजेती पी. व्ही. सिंधूवर विजय नोंदवीत इंडोनेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली.

गुडघ्याच्या दुखापतीनंतर कोर्टवर आलेल्या सायनाने भारताच्या अव्वल दोन खेळाडूंमधील थरार सरळ गेममध्ये २१-१३,२१-१९ असा जिंकला. विश्व चॅम्पियनशिपमध्ये कांस्यविजेत्या सायनाला उपांत्य लढतीत थायलंडची चौथी मानांकित रतचानोक इंतानोन हिचे आव्हान असेल. आतापर्यंत उभय खेळाडूंदरम्यान झालेल्या १३ लढतींमध्ये सायनाचे पारडे जड ठरले. सायनाने आठ सामने जिंकले आहेत. रतचानोकने अन्य एका उपांत्यपूर्व लढतीत ग्लास्गो विश्व चॅम्पियनशिपची विजेती जपानची नोजोमी ओकुहारा हिला नमविले.

भारताबाहेर सिंधूविरुद्ध प्रथमच खेळणा-या सायनाने पहिल्या गेममध्ये सुरुवातीला ३-० अशी आघाडी घेतल्यानंतर मागे वळून पाहिलेच नाही. एकवेळ ११-६ आणि नंतर १८-१० अशा आघाडीसह २१-१३ ने विजय नोंदविला. सायनाला दुस-या गेममध्ये संघर्ष करावा लागला. सिंधू एकवेळ १०-५ ने पुढे होती. पण सायनाने सलग पाच गुण संपादन करीत १०-१० अशी बरोबरी साधली. त्यानंतर उभय खेळाडू १४-१४ असे बरोबरीत आले होते. सायनाने यानंतर आघाडी घेणे सुरू केले. जय-पराजयाचे पारडे दोन्हीकडे झुकत असताना अखेर सायनाने २१-१९ अशी बाजी मारली.आंतरराष्ट्रीय पातळीवर याआधी सायना-सिंधू दोनदा समोरासमोर आल्या होत्या. दोन्हीवेळा भारतातच सामने झाले. सय्यद मोदी ग्रॅण्डप्रिक्स स्पर्धेत २०१४ ला सायनाने सिंधूवर विजय नोंदविला होता. मागच्या वर्षी सिंधू इंडियन ओपन सुपर सिरिजमध्ये विजयी ठरताच, तिने सायनाविरुद्ध पराभवाची परतफेड केली. नागपुरात अलीकडेच झालेल्या सिनियर राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत सायना सिंधूवर वरचढ ठरली होती.

टॅग्स :Saina Nehwalसायना नेहवालPV Sindhuपी. व्ही. सिंधूBadmintonBadminton