सायना, श्रीकांत फ्रेंच ओपन बॅडमिंटनच्या दुसऱ्या फेरीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2018 04:19 AM2018-10-25T04:19:44+5:302018-10-25T04:19:48+5:30

भारताचे स्टार खेळाडू सायना नेहवाल आणि किदाम्बी श्रीकांत यांनी येथे सुरू असलेल्या फ्रेंच ओपन बॅडमिंटन स्पर्धेची बुधवारी दुसरी फेरी गाठली.

Saina, Srikanth reach second round of French Open badminton | सायना, श्रीकांत फ्रेंच ओपन बॅडमिंटनच्या दुसऱ्या फेरीत

सायना, श्रीकांत फ्रेंच ओपन बॅडमिंटनच्या दुसऱ्या फेरीत

googlenewsNext

पॅरिस : भारताचे स्टार खेळाडू सायना नेहवाल आणि किदाम्बी श्रीकांत यांनी येथे सुरू असलेल्या फ्रेंच ओपन बॅडमिंटन स्पर्धेची बुधवारी दुसरी फेरी गाठली. समीर वर्मा याला मात्र सलामीला पराभवाचे तोंड पहावे लागले. मागच्या आठवड्यात डेन्मार्क ओपनची उपविजेती राहिलेल्या सायनाने महिला एकेरीत जपानची साएना कावाकामी हिचा २१-११, २१-११ ने पराभव केला. पुरुष एकेरीत गत चॅम्पियन श्रीकांतने हाँगकाँगचा वोंग विग की विन्सेटचा २१-१९, २१-१३ ने पराभव केला.
सायनाची गाठ आता २०१७ ची विश्व चॅम्पियन जपानची नोजोमी ओकुहारा आणि स्पेनची बितरिस कोरालेस यांच्यातील विजेतीविरुद्ध पडणार आहे. पाचवा मानांकित श्रीकांत कोरियाचा ली डोंग कियूनविरुद्ध खेळेल. मागील आठवड्यात उपांत्यपूर्व फेरी गाठणाºया समीरला आशियाई क्रीडा स्पर्धेचा सुवर्ण विजेता इंडोनेशियाचा जपनाथन ख्रिस्तीकडून १६-२१,२१-१७,२१-१५ ने पराभवाचा धक्का बसला.
पुरुष दुहेरी गटामध्ये मनू अत्री आणि बी. सुमित रेड्डी या भारतीय जोडीने कोरियाचे मिन ह्यूक काँग- किम वोन यांना २१-१८,२१-१७ ने नमविले. मिश्र दुहेरीत सात्त्विक साईराज रंकीरेड्डी-अश्विनी पोनप्पा यांनी इंग्लंडचे ख्रिस एडकॉक-गॅब्रियल एडकॉक यांच्यावर २४-२२,१८-२१,२१-१९ ने सरशी साधली. रोहन कपूर-कुहू गर्ग यांच्या जोडीला चीनच्या जोडीकडून पराभव पत्करावा लागला. (वृत्तसंस्था)

Web Title: Saina, Srikanth reach second round of French Open badminton

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.