शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

सायना नेहवालनं पी. व्ही. सिंधूचा पराभव करत इंडोनेशिया मास्टर्स उपांत्य फेरीत केला प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2018 16:31 IST

सायना नेहवालनं शुक्रवारी इंडोनेशिया मास्टर्स बॅडमिंटनच्या स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत पी. व्ही. सिंधूचा पराभव केला. सायना नेहवालनं पी. व्ही. सिंधूवर 21-13, 21-19 अशी मात केली आहे.

जकार्ता- सायना नेहवाल आणि पी. व्ही. सिंधू या भारताच्या दोन आघाडीच्या बॅडमिंटनपटूमध्ये इंडोनेशियात जबरदस्त सामना रंगलाय. या सामन्यात  सायना नेहवालनं इंडोनेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत पी. व्ही. सिंधूचा पराभव केला. सायना नेहवालनं पी. व्ही. सिंधूवर 21-13, 21-19 अशी दोन सेटमध्ये मात केली आहे. सिंधूचा पराभव करत सायना नेहवालनं इंडोनेशिया मास्टर्स उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला आहे.लंडन ऑलिम्पिक स्पर्धेतील कांस्यपदक विजेती सायना नेहवालनं उपांत्यपूर्व फेरीपर्यंत पोहोचण्यासाठी चीनच्या चेन झियोझिनचा 21-12, 21-18 अशा दोन सेटमध्ये पराभव केला होता. तर सिंधूनं मलेशियाच्या गोह जिन वी एकाकी झुंज देत 21-12, 21 -9 असा पराभवाची धूळ चारली होती. सिंधू आणि सायना यापूर्वीही आंतरराष्ट्रीय स्तरावर दोनदा आमने-सामने आल्या होत्या. 2014मध्ये झालेल्या सय्यद मोदी ग्रांप्री स्पर्धेतही सिंधूला सायनाकडून पराभव पत्करावा लागला होता. गेल्या काही महिन्यांपूर्वी बॅडमिंटन खेळाच्या जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानी असलेल्या पी. व्ही. सिंधूचा पराभव करत सायना नेहवालनं 82व्या सीनियर राष्ट्रीय बॅडमिंटन चॅम्पियनशिपचा किताब पटकावला होता. अटीतटीच्या लढतीत सायनानं सिंधूचा 21-17, 27-25 असा पराभव केला.

टॅग्स :BadmintonBadmintonSaina Nehwalसायना नेहवालPV Sindhuपी. व्ही. सिंधू