शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
2
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
3
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
4
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
5
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
6
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
7
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
8
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
9
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
10
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
11
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
12
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
13
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
14
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
15
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
16
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
17
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
18
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
19
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
20
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा

सायना, सिंधू, श्रीकांत, समीर, प्रणय दुस-या फेरीत, पुढील फेरीत सायनाची लढत कॅरोलिना मारीनविरुद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2017 3:49 AM

आठवडाभरानंतर कोर्टवर परतलेले सायना नेहवाल, पी. व्ही. सिंधू आणि किदाम्बी श्रीकांत यांनी विपरीत स्थितीत विजय मिळवून जपान ओपन सुपर सिरीज बॅडमिंटनच्या दुस-या फेरीत धडक दिली.

टोकियो : आठवडाभरानंतर कोर्टवर परतलेले सायना नेहवाल, पी. व्ही. सिंधू आणि किदाम्बी श्रीकांत यांनी विपरीत स्थितीत विजय मिळवून जपान ओपन सुपर सिरीज बॅडमिंटनच्या दुस-या फेरीत धडक दिली.विश्व चॅम्पियनशिपचे कांस्य जिंकणाºया सायनाने जांघेतील मांसपेशी ताणल्या गेल्यामुळे कोरिया ओपनमध्ये भाग घेतला नव्हता.तिने बुधवारी पहिल्या सामन्यात थायलंडची पोर्नपावी चोचुवोंगहिचा ३९ मिनिटांत २१-१७, २१-९ ने पराभव केला. लंडन आॅलिम्पिकची कांस्यविजेती असलेल्या सायनाला पुढील फेरीत आॅलिम्पिक चॅम्पियन स्पेनची कॅरोलिना मारीन हिच्याविरुद्ध खेळावे लागेल.मारीनविरुद्ध सायनाच्या जय-पराजयांचा रेकॉर्ड ४-३ असा आहे. तथापि, मागच्या चारपैकी ३ सामन्यांत सायनाला मारीनविरुद्ध पराभवाचे तोंड पाहावे लागले आहे. दुसरीकडे रिओ आॅलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकणारी पी़ व्ही. सिंधूने उत्कृष्ठ खेळाचे प्रदर्शन करुन जपानच्या मिनात्सु मितानीचा १२-२१, २१-१५, २१-१७ गुणांनी पराभव केला़ इंडोनेशिया आणि आॅस्ट्रेलिया ओपनविजेता श्रीकांत याने जागतिक क्रमवारीत दहाव्या स्थानावर असलेला चीनचा टियान होवेई याचा २१-१५, १२-२१, २१-११ अशा फरकाने पराभव केला. आठवा मानांकित श्रीकांतला आता पुढील फेरीत हाँगकाँगचा हू यून याचे आव्हान असेल. उभय खेळाडूंचा परस्परांविरुद्धचा रेकॉर्ड २-२ असा आहे. अमेरिकन ओपन ग्रॅण्डप्रिक्स चॅम्पियन एच. एस. प्रणय आणि सय्यद मोदी ग्रॅण्डप्रिक्सविजेता समीर वर्मा यांनी सरळ विजयाची नोंद करून पुढील फेरी गाठली. प्रणयने डेन्मार्कचा अँडर्स अँटोन्सन याच्यावर २१-१२, २१-१४ ने, तर समीरने थायलंडचा खोसिक फेटप्रदाब याच्यावर ४० मिनिटांत २१-१२, २१-१९ ने विजय नोंदविला.समीरचा मोठा भाऊ सौरभ वर्मा हा सातवा मानांकित आणि दोन वेळचा आॅलिम्पिक चॅम्पियन चीनचा लिन दान याच्याकडून २१-११, १५-२१, १३-२१ अशा फरकाने पराभूत होताच स्पर्धेबाहेर पडला. सात्त्विक साईराज रंकीरेड्डी-अश्विनी पोनप्पा यांनी मिश्र गटात पहिला अडथळा पार केला. या जोडीने थायलंडच्या टिन इसरियानेत-पांचापूर चोचुवोंग यांच्यावर २१-१७, २१-१३ ने विजय नोंदविला. सात्त्विक-चिराग शेट्टी या जोडीला पुरुष दुहेरीत पराभवाचे तोंड पाहावे लागले. इंडोनेशियाची जोडी मार्क्सगिडोन-संजयासुकामुलयो यांच्याकडून त्यांचा २५-२७, १५-२१ असा पराभव झाला. मनू अत्री-बी. (वृत्तसंस्था)