शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

सायना नेहवाल ताइकडून पराभूत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2018 01:40 IST

भारताची अव्वल खेळाडू सायना नेहवालाला इंडोनेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत तैवानच्या ताई जु यिनकडून अवघ्या २७ मिनिटांत सरळ दोन सेटमध्ये पराभवाचा सामना करावा लागला.

जकार्ता -  भारताची अव्वल खेळाडू सायना नेहवालाला इंडोनेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत तैवानच्या ताई जु यिनकडून अवघ्या २७ मिनिटांत सरळ दोन सेटमध्ये पराभवाचा सामना करावा लागला.एक वर्षानंतर दुखापतीनंतर आंतरराष्ट्रीय स्पर्धेत अंतिम फेरीत प्रवेश केलेल्या सायनाला एकतर्फी लढतीत ९-२१, १३-२१ असा पराभव पत्करावा लागला. ताईकडून सायनाचा हा सलग सातवा पराभव आहे. जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या ताईने लढतीच्या सुरुवातीपासून नियोजनबद्ध खेळ करीत गुणांमध्ये आघाडी घेतली. पहिल्या गेममध्ये जेव्हा ७-१२ असे गुण होते, तेव्हा या दोघींमध्ये ४३ शॉटची रॅली झाली. या वेळी सायनाने शटलबाहेर मारले आणि रॅली संपली. ताइने सायनाविरुद्ध पहिल्या गेमपासून गुणांमध्ये आघाडी ठेवली होती.ताइने दोन्ही गेम सहज जिंकून सायनाला पराभूत केले. १२ व्या क्रमांकावर असलेल्या सायनाला ताइने गेल्या दहा लढतींमध्ये नऊ वेळा नमविले आहे.२०११मध्ये सायनाने तैवानच्या या खेळाडूला पराभूत केले होते. त्यानंतर २०१३ मध्ये सायनाने ताइविरुद्ध स्वीस ओपनमध्ये विजय नोंदविला होता.

टॅग्स :Saina Nehwalसायना नेहवालBadmintonBadminton