शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

व्यस्त वेळापत्रकावर भडकली सायना, बीडब्ल्यूएफला धरले धारेवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2017 12:53 IST

विश्व बॅडमिंटन महासंघाच्या (बीडब्ल्यूएफ) व्यस्त वेळापत्रकावर स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवाल हिने टीका केली. आंतरराष्ट्रीय सामन्यांचे आयोजन पाठोपाठ होत असल्याने खेळाडूंकडे जखमांतून सावरण्यास पुरेसा वेळ नसल्याचे सायनाचे मत आहे.

नवी दिल्ली : विश्व बॅडमिंटन महासंघाच्या (बीडब्ल्यूएफ) व्यस्त वेळापत्रकावर स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवाल हिने टीका केली. आंतरराष्ट्रीय  सामन्यांचे आयोजन पाठोपाठ होत असल्याने खेळाडूंकडे जखमांतून सावरण्यास पुरेसा वेळ नसल्याचे सायनाचे मत आहे.बीडब्ल्यूएफने २०१८ च्या नव्या वेळापत्रकात आघाडीच्या बॅडमिंटनपटूंना वर्षभरात किमान १२ स्पर्धा खेळणे अनिवार्य केले आहे. प्रीमियर बॅडमिंटन लीगचे (पीबीएल) उद्घाटन झाल्यानंतर सायना म्हणाली, ‘बीडब्ल्यूएफचा पुढील वर्षाचा कार्यक्रम अतिशय व्यस्त आहे. अव्वल खेळाडूंसाठी हे योग्य नाही. सर्वोत्कृष्ट कामगिरीसाठी दोन स्पर्धांमध्ये पुरेसे अंतर असायला हवे. मी सलगपणे स्पर्धा खेळू शकत नाही. स्पर्धेत सहभागी होऊ शकते, पण जिंकू शकणार नाही.’पीबीएलनंतर ३ स्पर्धा आहेत. विश्व चॅम्पियनशिपआधी ३ सुपर सीरिजचे आयोजन होणार आहे. हे पाहता बीडब्ल्यूएफने इतके व्यस्त वेळापत्रक का आखले, हेच आकलनापलीकडचे आहे. खेळाडूंसाठी हे थकविणारे आणि आव्हानात्मक असल्याचे सायनाचे मत आहे.पीबीएलच्या तिसºया पर्वात अवध वॉरियर्सचे प्रतिनिधित्व करणारी सायना पुढे म्हणाली, ‘मी सर्वच स्पर्धा खेळणार की नाही, याची शाश्वती नाही. माझे प्राधान्य फिटनेसला आहे, स्पर्धा जिंकण्याला नाही.खेळाडूंकडून पुढच्या सत्रात राष्टÑीय चॅम्पियनशिपमध्ये खेळण्याची अपेक्षा बाळगणे योग्य आहे काय, असे विचारताच सायना म्हणाली,‘पुढच्या सत्रातील व्यस्त वेळापत्रक बघता राष्टÑीय चॅम्पियनशिप कुठेच बसत नाही. तीन दिवसांचीस्पर्धा झाल्यास माझ्या मते, कुणालाही फरक जाणवणार नाही. राष्टÑकुल, आशियाड आणि विश्व चॅम्पियनशिपच्या आयोजनामुळे प्रत्येक स्पर्धेदरम्यान दोन आठवड्यांत स्वत:ला सज्ज करण्याचे आव्हान असेल. खेळाडू जखमी झाला असेल तर त्याला जखमेतून सावरण्यास वेळ नाहीच, असे सायनाचे मत आहे.आॅलिम्पिक आणि विश्व चॅम्पियन स्पेनची कॅरोलिना मारिन हिनेदेखील सायनाच्या मताशी सहमती दर्शविली. मारिन म्हणाली, ‘पुढील सत्रातील व्यस्त वेळापत्रक थकविणारे आहे. पुढच्या आॅल इंग्लंड चॅम्पियनशिपमध्ये लागू होणारे नवे नियम ‘मूर्ख बनविणारे’ असल्याचा उल्लेख केला. (वृत्तसंस्था)बीडब्ल्यूएफने गटातील एकेरीतील अव्वल१५ खेळाडूंना आणि दुहेरीच्या अव्वल १० जोड्यांना वर्षांत १२ स्पर्धांमध्ये भाग घेणे अनिवार्य केले आहे. असे न केल्यासत्यांच्यावर दंडात्मक कारवाई होईल.पीबीएलच्या तिसºया सत्रात ८ संघांत ८० खेळाडू आहेत. त्यात विश्व चॅम्पियनशिपमधील आठ पदक विजेते आणि नऊ आॅलिम्पिक पदकविजेते सहभागी होतील. दिल्ली, लखनौ, गुवाहाटी, हैदराबाद आणि चेन्नई येथे सामने खेळले जातील.‘बीडब्ल्यूएफ बॅडमिंटनला टेनिससारखे करण्याचा प्रयत्न करीत असेल तर मग ग्रॅण्डस्लॅमसारख्या केवळ चार-पाच स्पर्धा व्हायला हव्यात. त्यामुळे अधिक आर्थिक नफा आणि प्रसिद्धी होईल. मी बीडब्ल्यूएफ प्रमुख असते तर निश्चितपणे हेच केले असते. अधिक रोख पारितोषिकांवर मी आनंदी आहे, पण इतक्या स्पर्धा होत असतीलतर खेळाडूंचे काही खरे नाही...’- सायना नेहवाल

टॅग्स :Saina Nehwalसायना नेहवालBadmintonBadminton