शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

पीव्ही सिंधूने कोरियन ओपन सुपर सिरीजच्या फायनलमध्ये केला प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2017 15:01 IST

भारताची अव्वल महिला बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने कोरियन ओपन सुपर सीरीजच्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे.

ठळक मुद्देसिंधूने चीनच्या ही बिंगजिओचा 21-10, 17-21, 21-16 असा सरळ तीन गेममध्ये पराभव केला. 

सेऊल, दि. 16 - भारताची अव्वल महिला बॅडमिंटनपटू पी.व्ही.सिंधू कोरियन ओपन सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेच्या विजेतेपदापासून एक पाऊल दूर आहे. सिंधूने शनिवारी चीनच्या ही बिंगजिओचा 21-10, 17-21, 21-16 असा पराभव करत कोरियन ओपन सुपर सिरीज स्पर्धेच्या अंतिमफेरीत प्रवेश केला. एक तास सहा मिनिटे हा सामना सुरु होता. 

सिंधूचा अंतिम सामना जपानच्या नोझोमी ओकुहारा विरुद्ध होणार आहे. मागच्या महिन्यातच वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियशिपमध्ये ओकुहाराकडून पराभव झाल्यामुळे सिंधूला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले होते. सिंधूला कोरियन सुपर सिरीजच्या निमित्ताने पराभवाचा हिशोब चुकता करण्याची संधी आहे. 

कोरिया ओपन सुपर सिरिज बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्वफेरीत सिंधूने  ऑलिम्पिक रौप्य विजेत्या जपानच्या मितासू मितानीचा  21-19 18-21 21-10  पराभव केला होता. 

या सामन्यात आक्रमक खेळाचे प्रदर्शन करताना सिंधूनं पूर्ण कोर्टचा उपयोग केला. तिचे फोरहँडच्या फटक्यांनी सामन्याचा निर्णय तिच्या बाजूने लावला. हा सामना जिंकण्यासाठी सिंधूला 63 मिनिटे लागली. पहिल्या सेटमध्ये सुरुवातीला सिंधूने 5-2 अशी आघाडी घेतली. मितानीने तिची आघाडी कमी करत पहिला सेट 8-6 असा केला. सामन्यात मिड इंटरव्हलसाठी थांबला तेव्हा मितानी 11-9 अशी आघाडीवर होती. सिंधूने त्यानंतर हा सेट 13-13 असा बरोबरीत आणला. दोन्ही खेळाडू 19-19 अश्या बरोबरीत आल्यावर सिंधूने आपला खेळ उंचावत पहिला सेट 21-19 असा जिंकला.

दुसऱ्या सेटमध्ये मितानी हिने उत्तम प्रदर्शन करताना 5-1 अशी आघाडी सिंधूने सलग गुण मिळवत तिची आघाडी 5-4 अशी केली. दुसऱ्या सेटमध्ये दोन्ही खेळाडू 8-8 अश्या बरोबरीत होत्या. त्यानंतर मितानीने सेटवर वर्चस्व गाजवत दुसरा सेट 21-16 असा जिंकत सामन्यात 1-1 अशी बरोबरी केली.  तिसऱ्या आणि निर्णायक तिसऱ्या सेटमध्ये सिंधूनं आपला खेळ पहिल्यापासूनच उंचावला.  या सेटमध्ये सुरुवातीला सिंधूने 6-2 अशी आघाडी मिळवली. मितानी केलेल्या चुकामुळे सिंधूने निर्णायक सेटमध्ये 9-3 अशी मोठी आघाडी मिळवली. त्यानंतर सिंधूने या सेटमध्ये वर्चस्व स्थापन करताना 15-9 अशी आघाडी मिळवली. यातून मितानीला सावरायला संधीच मिळाली नाही. शेवटचा सेट सिंधूने 21-10 असा जिंकत सामना आपल्या नावे केला. 

सिंधूचा कोरिया सुपर सिरीजमधील प्रवास - महिला एकेरीत सिंधूने शानदार खेळाचे प्रदर्शन करताना जागतिक क्रमवारीत 17 व्या स्थानी असलेल्या हाँगकाँगच्या चेउंग नगान हिला सरळ दोन गेममध्ये 21-13, 21-8 असा पराभव केला होता. ऑलिम्पिक रौप्य विजेती सिंधूने थायलंडची नितचाओन जिदापोलवर २२-२०, २१-१७ अशा फरकाने विजय नोंदविला.