शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
3
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
4
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
5
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
6
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
7
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
8
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
9
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
10
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
11
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
12
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
13
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
14
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
15
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
16
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
17
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
18
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
19
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
20
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द

प्रणयचा चोंगवर सनसनाटी विजय, डेन्मार्क सुपरसिरिज बॅडमिंटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2017 01:52 IST

एच. एस. प्रणय याने तीनवेळेचा आॅलिम्पिक चॅम्पियन ली चोंग वेई याच्यावर सलग दुसºयांदा खळबळजनक विजयाची नोंद करीत डेन्मार्क ओपन सुपरसिरिज बॅटमिंटन स्पर्धेची शुक्रवारी उपांत्यपूर्व फेरी गाठली.

ओडेन्से : एच. एस. प्रणय याने तीनवेळेचा आॅलिम्पिक चॅम्पियन ली चोंग वेई याच्यावर सलग दुस-यांदा खळबळजनक विजयाची नोंद करीत डेन्मार्क ओपन सुपरसिरिज बॅटमिंटन स्पर्धेची शुक्रवारी उपांत्यपूर्व फेरी गाठली. किदाम्बी श्रीकांतने देखील सहज विजयाची नोंद केली.चार महिन्यांपूर्वी प्रणयने इंडोनेशिया सुपर सिरिज प्रीमियरमध्ये चोेंग वेईवर सरळ गेममध्ये मात करीत खळबळ माजवून दिली होती. आजही मलेशियाच्या या अव्वल खेळाडूला प्रणयने एक तास तीन मिनिटांत २१-१७, ११-२१, २१-१९ ने धूळ चारली. जागतिक क्रमवारीत आठव्या स्थानावर असलेल्या श्रीकांतने कोरियाचा जियोन हियोक जीन याचा २१-१३, ८-२१, २१-१८ अशा फरकाने पराभव केला. सायनाने महिला एकेरीत थायलंडची नितचानोन जिंदापोल हिच्यावर २२-२०, २१-१३ ने सरशी साधली. पण, उपांत्यपूर्व फेरीत तिला जपानच्या अकाने यामगुचीविरुद्ध १०-२१, १३-२१ ने पराभव स्वीकारावा लागला. अमेरिकन ओपन चॅम्पियन असलेला प्रणय याची लढत कोरियाचा अव्वल मानांकित सोन वान याच्याविरुद्ध होईल. इंडोनेशिया आणि आॅस्ट्रेलिया सुपर सिरिजचा विजेता असलेल्या श्रीकांतला पुढील सामन्यात सध्याचा विश्व चॅम्पियन व्हिक्टर अ‍ॅक्सेलसन याचे आव्हान असेल. ग्लास्गो विश्व चॅम्पियनशिपची कांस्य विजेती सायनाला जपानची अकाने यामागुची हिचे आव्हान असेल.इंग्लंडचा राजीव ओसफ, हाँगकाँगचा ली हून, चायनीज तायपेईचा चोऊ टिएन यांनी देखील आज उपांत्यपूर्व फेरी गाठली.महिला एकेरीत वर्ल्ड नंबर वन ताई ज्यु यिग, कोरियाची सूंग जी हून, किम हूयोन मीन, जपानची सयाका सातो, चीनची चेन युफेई, आणि थायलंडची रतनाचोक इंतानोन यांनी अंतिम आठ खेळाडूत स्थान निश्चित केले.आॅलिम्पिक आणि विश्व स्पर्धेत रौप्य विजेती असलेली भारतीय स्टार पी. व्ही. सिंधू ही मात्र चीनची चेन युफेईकडून १७-२१, २१-२३ ने पराभव स्वीकारावा लागला. (वृत्तसंस्था)‘‘मी चोेंग वेईला दुसºयांदा मनवून खूश आहे. या वयातही तो सर्वोत्कृष्ट खेळाडूंपैकी एक आहे. मागच्यावेळी चोंगला हरविले पण जेतेपद पटकावू शकलो नव्हतो. त्यामुळेच पुढचा विचार न करता केवळ पुढील सामन्याचाच विचार करीत आहे.’’ - एच. एस. प्रणय

टॅग्स :BadmintonBadmintonSportsक्रीडा