शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : पाथरीत येणार नवीन दूध शीतकरण प्लॅन्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2019 00:04 IST

दुष्काळी तालुक्यातील शेतकऱ्यांनी बँकांकडून कर्ज काढून दुग्ध व्यवसाय उभा केला आहे. ३ हजार लिटर दुधाचे संकलन होणाऱ्या पाथरी येथील शासकीय दूध डेअरीवर आता २५ हजार लिटर दुधाची आवक होत आहे. त्यामुळे जालना जिल्ह्यातील अंबड येथील १० हजार लिटर क्षमतेचा अमोनिया चिलिंग प्लॅन्ट पाथरी येथे स्थलांतरित करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे.

विठ्ठल भिसे ।लोकमत न्यूज नेटवर्कपाथरी (परभणी): दुष्काळी तालुक्यातील शेतकऱ्यांनी बँकांकडून कर्ज काढून दुग्ध व्यवसाय उभा केला आहे. ३ हजार लिटर दुधाचे संकलन होणाऱ्या पाथरी येथील शासकीय दूध डेअरीवर आता २५ हजार लिटर दुधाची आवक होत आहे. त्यामुळे जालना जिल्ह्यातील अंबड येथील १० हजार लिटर क्षमतेचा अमोनिया चिलिंग प्लॅन्ट पाथरी येथे स्थलांतरित करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे.पाथरी येथे शासकीय दूध संकलन केंद्र आहे. तालुक्यातील दूध उत्पादक संस्थांकडून संकलित होणारे दूध या संकलन केंद्रावर संकलित होऊन थंड करुन परभणी येथील शासकीय दूध डेअरीवर पाठविले जाते. पाथरी येथे दूध संकलन केंद्रावर मागील काही वर्षात केवळ ३ हजार लिटर दुधाचे संकलन होत असे. शासकीय दूध संकलन केंद्रावर त्यासाठी २ हजार लिटर क्षमतेचे शीतकरण प्लॅन्ट आहे. मात्र ५ वर्षात या भागात दूध उत्पादक संस्थांची मोठ्या प्रमाणावर वाढ होऊन दूध उत्पादन वाढले आहे. पाथरी तालुक्यात ३५ दूध संकलन संस्थांकडून आज रोजी २५ हजार लिटर दुधाचे संकलन केले जात आहे. दोन वेळा पाथरी येथील शासकीय दूध डेअरीवर दूध पुरवठा करताना या संस्थांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. संकलन केंद्रावर दुधाचे शीतकरण करण्यासाठी सध्या ५ हजार लिटर क्षमतेचा प्लॅन्ट आहे. त्यामुळे या भागातून दूध शीतकरण करुन परभणीला नेण्यासाठी सुद्धा शासकीय यंत्रणेला अडचणी निर्माण झाल्याने मागील काही दिवसांत संस्थांचे मर्यादित दूध संकलन करण्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या. पर्यायाने दुष्काळी परिस्थिती असल्याने दूध उत्पादक करणाºया संस्था आणि दूध उत्पादक शेतकरी यांचे दूध खरेदी केले जात नव्हते. पाथरी तालुक्यात मागील काही वर्षात शेतकऱ्यांनी शेतीसोबत जोड धंद्याकडे लक्ष दिले आहे. जायकवाडीच्या पाण्यावर बराच चारा उपलब्ध होत आहे. असे असले तरी शासकीय दूध डेअरीत सोयी नसल्याने दूध व्यवसाय अडचणीत सापडला होता. पाथरी, सोनपेठ, सेलू आणि मानवत तालुक्यातील दुध उत्पादकांनी काही महिन्यांपूर्वी आ.मोहन फड यांच्याकडे राज्य शासनाकडून पाथरीत नवीन शीतकरण प्लॅन्ट बसवून देण्याची मागणी केली होती. आ. मोहन फड यांनी दुग्ध व्यवसाय मंत्री महादेव जानकर यांच्याकडे शेतकºयांना घेऊन याबाबतचा पाठपुरावा केला. त्यानंतर १० हजार लिटर क्षमतेने अंबड येथील चालू स्थितीतील अमोनिया चिलिंग प्लॅन्ट पाथरीत स्थलांतरित करण्याची परवानगी देण्यात आली आहे.निधीही दिला उपलब्ध करुनअंबड येथील अमोनिया शीतकरण प्लॅन्ट पाथरी येथे स्थलांतरित करण्यासाठी निधीची आवश्यकता होती. केवळ निधीमुळे या प्लॅन्टचे स्थलांतर थांबू नये, यासाठी शासनाने जिल्हा नियोजन समितीमार्फत प्लॅन्ट स्थलांतरित करण्यासाठी निधी उपलब्ध करुन दिला आहे. त्यामुळे १० हजार क्षमता असलेले शीतकरण प्लॅन्ट येत्या काही दिवसांत पाथरी येथे कार्यान्वित होण्याच्या दृष्टीने प्रशासकीय स्तरावर कार्यवाही सुरु झाली आहे.दुधातील फॅट अधिकशासकीय नियमानुसार गायीच्या आणि म्हशीच्या दुधात अनुक्रमे ३़५ आणि ६ टक्के फॅटचे प्रमाण असणे आवश्यक आहे़ पाथरी व परिसरातील गाय व म्हशीच्या दुधातील फॅट अधिक असल्याने या दुधाला इतर ठिकाणी चांगली मागणी आहे़ त्याचा शेतकºयांना फायदा होत आहे़पाथरी येथे १० हजार लिटर क्षमता असलेला अमोनिया शीतकरण प्लॅन्टचे मार्च महिन्याअखेरपर्यंत काम पूर्ण होऊन शेतकºयांचा प्रश्न मार्गी लागेल.-सतीश डोईफोडे, जिल्हा दुग्ध अधिकारी

टॅग्स :parabhaniपरभणीmilkदूधFarmerशेतकरी