शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पी. व्ही. सिंधू, सायना नेहवाल दुसऱ्या फेरीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2019 03:21 IST

आशियाई बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धा; श्रीकांतचा पहिल्याच फेरीत पराभव

वुहान(चीन) : स्टार खेळाडू पी.व्ही. सिंधू आणि ‘फुलराणी’ सायना नेहवाल यांनी बुधवारी संघर्षमय विजयाची नोंद करीत आशियाई बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत दुसरी फेरी गाठली. त्याचवेळी भारताचा अव्वल पुरुष शटलर किदाम्बी श्रीकांत याला मात्र अनपेक्षित पराभवाचा धक्का सहन करावा लागल्याने स्पर्धेतून पहिल्याच फेरीत आपला गाशा गुंडाळावा लागला.आॅलिम्पिक आणि विश्व चॅम्पियनशिपची रौप्य विजेती असलेल्या सिंधूने सरळ गेममध्ये जपानची ताकाहाशी सयाकावर २८ मिनिटात २१-१४, २१-७ ने वर्चस्वपूर्ण विजय संपादन केला. स्पर्धेत चौथे मानांकन लाभलगली सिंधू पुढील फेरीत इंडोनेशियाची चोईरूनिसाविरुद्ध खेळेल.जागतिक क्रमवारीत नवव्या स्थानावर असलेल्या सायनाला चीनची हान युए हिला पराभूत करताचा बराच घाम गाळावा लागला. सातवे मानांकन लाभलेल्या सायनाने पहिला गेम १२-२१ असा गमविल्यानंतर जोरदार मुसंडी मारली. पुढील दोन्ही गेम सायनाने २१-११, २१-१७ अशा फरकाने जिंकले. लंडन आॅलिम्पिकची कांस्य विजेती असलेल्या सायनाला पुढील फेरीत द. कोरियाची किम गा युनविरुद्ध खेळणार आहे.पुरुष एकेरीत समीर वर्मा याने जपानचा सकाई काजुमासा याच्यावर कडव्या संघर्षात २१-१३, १७-२१, २१-१८ ने सरश्ी साधली. तो आता हाँगकाँगचा निग लोंगविरुद्ध खेळेल. पुरुष दुहेरीत एमआर अर्जुन आणि श्लोक रामचंद्रन हे पराभूत झाले. महिला दुहेरीत मेघना जाकामपुडी- पूर्विशा राम ही जोडी देखील थायलंडच्या प्रतिस्पर्धी जोडीकडून पारभूत होताच स्पर्धेबाहेर पडली.किदाम्बी श्रीकांतला धक्काकिदाम्बी श्रीकांतला मात्र पराभवाचे तोेंड पहावे लागले. पुरुष एकेरीत पाचवा मानांकित असलेला श्रीकांत ४४ मिनिटांच्या संघर्षात इंडोनेशियाचा शेसार हिरेन रूस्तावितो याच्याकडून १६-२१, २०-२२ ने पराभूत झाला. इंडियन ओपननंतर उभय खेळाडूंमध्ये ही दुसरी लढत होती. दोघेही २०११ च्या बीडब्ल्यूएफ विश्व ज्युनियर स्पर्धेत एकमेकांविरुद्ध खेळले होते. त्यात इंडोनेशियाचा हिरेनने बाजी मारली होती.

टॅग्स :Saina Nehwalसायना नेहवालPV Sindhuपी. व्ही. सिंधू