शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

वर्ल्ड टूर फायनल्स बॅडमिंटन: पी. व्ही. सिंधू जेतेपदाचा दुष्काळ संपवण्यास सज्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2018 12:52 IST

ऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्या पी.व्ही. सिंधूने वर्ल्ड टूर फायनल्सच्या अंतिम फेरीत प्रवेश केला.

ठळक मुद्देपी. व्ही. सिंधूची अंतिम फेरीत धडकमाजी विश्वविजेत्या रॅटचानोक इंटानोनचा सरळ गेममध्ये पराभव जेतेपदाच्या लढतीत विश्वविजेत्या नोझोमी ओकुहाराचा सामना

ग्वांग्झू : ऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्या पी. व्ही. सिंधूने वर्ल्ड टूर फायनल्सच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. 2018 मध्ये आत्तापर्यंत एकही जेतेपद पटकावता आलेले नाही. त्यामुळे 2018मधील अखेरच्या स्पर्धेत तो दुष्काळ संपवण्याचा सिंधूचा निर्धार आहे. उपांत्य फेरीत सिंधूने माजी विश्वविजेत्या रॅटचानोक इंटानोनचा सरळ गेममध्ये पराभव केला. 

 23 वर्षीय सिंधूने येथेच 2013मध्ये जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत पहिले पदक जिंकले होते. त्यानंतर तिला येथे सुवर्णपदक जिंकण्याची संधी आहे. उपांत्य फेरीत सिंधूने 54 मिनिटांच्या खेळात 21-16, 25-23 असा सरळ गेममध्ये विजय मिळवला. तिला जेतेपदाच्या लढतीत 2017च्या विश्वविजेत्या नोझोमी ओकुहाराचा सामना करावा लागणार आहे. जपानच्या ओकुहाराने उपांत्य फेरीत अकाने यामागुचीवर 21-17, 21-14 असा विजय मिळवला. सिंधूने गटात अव्वल स्थान पटकावत आत्मविश्वास उंचावला होता. तिने ताय त्झु यिंगचा पराभव करत उपांत्य फेरीतील प्रवेश निश्चित केला. इंटानोनविरुद्ध सिंधूला सात सामन्यांत 3 विजय मिळवता आले होते, त्यामुळे या लढतीत थायलंडच्या खेळाडूचे पारडे जड मानले जात होते. मात्र, सिंधूने सरस खेळ केला.

सिंधूने आक्रमक खेळ करताना पहिला गेम सहज जिंकला. दमदार स्मॅश आणि नेट जवळील कल्पक खेळ, याच्या जोरावर सिंधूने हा गेम 21-16 असा घेतला. मात्र, दुसऱ्या गेममध्ये थायलंडच्या खेळाडूने आपला दबदबा दाखवला. 4-0 अशा पिछाडीनंतर इंटानोनने गेम 7-7 असा बरोबरीत आणला. त्यानंतर 11-10 अशी एका गुणाची आघाडी घेतली, परंतु सिंधून लढाऊ बाणा दाखवला. सामना चुरशीचा होत असताना इंटानोनचे अचानक तंत्रात बदल केला आणि सिंधूला बचावात्मक खेळ करण्यास भाग पाडले. 

दोन्ही खेळाडूंनी हा गेम नावावर करण्यासाठी दमदार खेळ केला. मात्र, सिंधूने 25-23 अशी बाजी मारताना सामना खिशात घातला. 

टॅग्स :PV Sindhuपी. व्ही. सिंधूBadmintonBadminton