शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

भारताच्या पी. व्ही. सिंधूची चीन ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2017 18:19 IST

भारताची ऑलिम्पिक रौप्यपदक विजेती बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू हिने चीन ओपन सुपर सीरिज बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक दिली आहे.

फुजोऊ - भारताची ऑलिम्पिक रौप्यपदक विजेती बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू हिने चीन ओपन सुपर सीरिज बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक दिली आहे. आज झालेल्या महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व लढतीत सिंधूने चीनच्या हान यू हिच्यावर 21-15, 21-13 अशी सरळ गेममध्ये मात केली. सायना नेहवालचे आव्हान संपुष्टात आल्याने स्पर्धेतील महिला गटात भारताची मदार आता सिंधूवरच आहे. एकतर्फी झालेल्या लढतीत सिंधुने चिनी प्रतिस्पर्ध्यावर सुरुवातीपासूनच वर्चस्व राखले. तिने आक्रमक खेळ करून पहिला गेम 21-15 अशा फरकाने तर दुसरा गेम 21-13 अशा फरकाने जिंकून उपांत्य फेरी गाठली. तत्पूर्वी  भारताच्या सायना नेहवालचे चीन ओपन सुपर सीरिज बॅडमिंटन स्पर्धेतील आव्हान उपांत्यपूर्व फेरीतच संपुष्टात आले. सलामीच्या लढतीत अमेरिकेच्या बेईवान झँग हिला पराभूत करणाऱ्या सायनाला या लढतीत जपानच्या पाचव्या मानांकीत  अकाने यामागुची हिचे आव्हान परतवून लावणे शक्य झाले नाही.  सायनाला 18-21, 11-21 असा सरळ गेममध्ये पराभव पत्करावा लागला. यामागुचीविरुद्धच्या लढतीत सायनाला आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करता आला नाही. पहिल्याच गेममध्ये सायनाचे आव्हान मोडीत काढताना यामागुची हिने गेम 21-18 अशा फरकाने जिंकला. त्यानंतर दुसऱ्या गेममध्ये यामागुचीने संपूर्ण वर्चस्व राखत सायनाला 11-21 अशी मात दिली आणि तिचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आणले. पहिल्या फेरीत सायनाने अमेरिकेच्या बेइवान झैंग हिला केवळ ३० मिनिटांमध्ये २१-१२, २१-१३ असे नमवून शानदार आगेकूच केली होती. त्याआधी काल लागलेल्या एका धक्कादायक निकालामध्ये पाचवेळचा जागतिक आणि दोन वेळचा ऑलिम्पिक चॅम्पियन चीनच्या लीन डॅनचा चायना ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या पहिल्याच फेरीत खळबळजनक पराभव झाला होता.   तब्बल ७ मॅच पॉइंट वाचवल्यानंतर लीनला पहिल्याच फेरीत आपला गाशा गुंडाळावा लागला हे विशेष. इंडोनेशियाचा जागतिक क्रमवारीत १७व्या स्थानी असलेल्या जोनाथन ख्रिस्टी याने लीनला स्पर्धेबाहेरचा रस्ता दाखवला होता.  जोनाथनने दोन गेमपर्यंत रंगलेल्या रोमांचक सामन्यात खळबळ माजवताना बलाढ्य लीनचे २१-१९, २१-१६ असे आव्हान संपुष्टात आणले होते.  

टॅग्स :BadmintonBadmintonIndiaभारत