शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
2
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
3
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
4
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
5
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
6
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
7
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
8
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
9
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
10
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
11
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
12
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
13
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
14
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
15
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
16
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
17
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
18
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
19
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला

भारतामध्ये चांगले प्रशिक्षक घडविण्याची गरज- पुलेल्ला गोपीचंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2017 20:58 IST

मुंबई : आज भारतामध्ये चांगले प्रशिक्षक घडविण्यावर अधिक भर दिला गेला पाहिजे असे म्हटलेल्या प्रकाश पदुकोण यांच्या मताशी मी पूर्णपणे सहमत आहे.

मुंबई : आज भारतामध्ये चांगले प्रशिक्षक घडविण्यावर अधिक भर दिला गेला पाहिजे असे म्हटलेल्या प्रकाश पदुकोण यांच्या मताशी मी पूर्णपणे सहमत आहे. भारतीय बॅडमिंटनच्या प्रगतीसाठी चांगले प्रशिक्षक घडने अत्यावश्यक आहे, असे भारताचा राष्ट्रीय बॅडमिंटन प्रशिक्षक पुलेल्ला गोपीचंद यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.बुधवारी मुंबईत पुलेल्ला गोपीचंद अकादमीने आघाडीच्या बँकेसह यंग चॅम्प्स या नावाने अनोख्या उपक्रमाची घोषणा केली. या उपक्रमअंतर्गत गोपीचंद अकादमी देशभरातील १० वर्षांखालील गुणवान खेळाडूंचा शोध घेणार आहे. या उपक्रमाची घोषणा केल्यानंतर गोपीचंदने आपले मत मांडले.काही दिवसांपूर्वी पदुकोण यांनी मुंबईत म्हटले होते की, बॅडमिंटनमध्ये प्रगती करण्यासाठी भारताला प्रशिक्षक प्रशिक्षण शिबीर मोठ्या प्रमाणात राबविण्याची आवश्यकता आहे. याविषयी विचारले असता गोपीचंद म्हणाले की, मी या मताशी पूर्णपणे सहमत आहे. केवळ प्रशिक्षक प्रशिक्षणावर भर न देता प्रशिक्षकांचा सन्मान, त्यांचे मानधन आणि प्रशिक्षकांच्या इतर गरजा यावरही गंभीर विचार केला पाहिजे. शिवाय ही प्रक्रीया दीर्घकालीन असल्याने आपल्याला चांगले खेळाडू घडवायचे असतील, तर त्याआधी चांगले प्रशिक्षक घडविणे आवश्यक आहे.यंदाचे वर्ष भारतीय बॅडमिंटनसाठी शानदार ठरल्याचे सांगताना गोपीचंद म्हणाले की, माझ्या मते सर्वच खेळाडूंनी यंदा चांगली कामगिरी केली. जागतिक अजिंक्यपद किंवा सुपर सिरीजसारख्या मोठ्या स्पर्धांमध्ये आपल्या खेळाडूंनी छाप पाडली. गतवर्ष पी. व्ही. सिंधूने गाजवले, तर यंदाच्या वर्षी पुरुष खेळाडूंनी वर्चस्व राखले. यंदा किदाम्बी श्रीकांतने चार सुपर सिरीज जेतेपद पटकावण्याची अद्भुत कामगिरी केली आहे. आगामी दुबई ओपन सिरीज स्पर्धेतही भारतीयांकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे........................................गोपीचंद अकादमी यंग चॅम्प्स उपक्रमाची घोषणा केली असून याअंतर्गत देशभरातील १० वर्षांखालील खेळाडूंची गुणवत्ता शोधण्यात येणार आहे. या शोध मोहिमेत सहभागी होण्यासाठी इच्छुक पालकांनी आपल्या मुला-मुलींचा बॅडमिंटन खेळतानाचा व्हिडीओ सोशल नेटवर्किंगवर २८ डिसेंबरपर्यंत अपलोड करण्याचे आवाहन गोपीचंद यांनी केले आहे. व्हिडीओद्वारे युवा खेळाडूंमधील क्षमता पाहून निवडक १०-१५ खेळाडूंना हैदराबाद येथे गोपीचंद अकादमीमध्ये प्रशिक्षण घेण्यासाठी बोलाविण्यात येईल.