शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
2
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
3
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
4
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
5
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
6
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
7
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
8
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
9
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
10
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
11
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
12
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
13
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
14
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
15
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
16
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
17
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
18
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
19
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
20
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा

भारताचा अव्वल बॅडमिंटनपटू श्रीकांतला धक्का देत प्रणॉय बनला नॅशनल चॅम्पियन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2017 20:09 IST

जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानी असलेल्या किदम्बी श्रीकांतला धक्का देत युवा बॅडमिंटनपटू एच. एस. प्रणॉय याने राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेतील पुरुष एकेरीचे विजेतेपद पटकावले आहे.

नागपूर - जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानी असलेल्या किदम्बी श्रीकांतला धक्का देत युवा बॅडमिंटनपटू एच. एस. प्रणॉय याने राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेतील पुरुष एकेरीचे विजेतेपद पटकावले आहे. आज झालेल्या पुरुष एकेरीच्या अंतिम लढतीत प्रणॉयने अटीतटीच्या लढतीत श्रीकांतवर 21-15, 16-21, 21-7 अशी मात केली. 

देशाचा अव्वल बॅडमिंटनपटू श्रीकांत आणि धक्कादायक निकाल नोंदवण्याची क्षमता बाळगणारा प्रणॉय यांच्यातील लढत चुरशीची होईल अशी अशी अपेक्षा होती आणि अपेक्षेप्रमाणे ही लढत अटीतटीची झाली. प्रणॉयने अंतिम लढतीत सनसनाटी सुरुवात करत पहिला गेम 21-15 अशा फरकाने जिंकला. मात्र अनुभवी श्रीकांतने सामन्यात पुनरागमन करताना दुसऱ्या गेममध्ये 21-16 ने बाजी मारली. 

दोन गेमनंतर लढत 1-1 अशा बरोबरीत असल्याने तिसऱ्या आणि निर्णायक गेममध्ये चुरस अधिकच वाढली. मात्र आजचा दिवस प्रणॉयचा होता. त्याने आक्रमक खेळाचे प्रदर्शन करत तिसऱ्या गेममध्ये श्रीकांतचा 21-7 अशा मोठ्या फरकाने धुव्वा उडवला. त्याबरोबरच प्रणॉयने या लढतीत 21-15, 16-21, 21-7 अशी बाजी मारत विजेतेपदावर कब्जा केला. विजयानंतर चाहत्यांनी उभे राहून टाळ्यांच्या कडकडाटात प्रणयचे अभिनंदन केले. प्रणयने देखील अभिवादन करीत स्वत:चे रॅकेट प्रेक्षकागॅलरीत भिरकावले. नीरज अग्रवाल नावाच्या प्रेक्षकास हे  अनपेक्षित गिफ्ट मिळाले. 

तत्पूर्वी काल झालेल्या पहिल्या उपांत्य सामन्यात प्रणॉयने महाराष्ट्राचा खेळाडू शुभांकर डे याचा २१-१४, २१-१७ ने पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला होता. तर दुस-या उपांत्य सामन्यात अनुभवी श्रीकांतने उत्तराखंडच्या लक्ष्य सेन याची  झुंज मोडून काढत २१-१६, २१-१८ने बाजी मारली होती. 

पहिले जेतेपद अभिमानास्पद  पहिले राष्ट्रीय विजेतेपद मिळविणे माझ्यासाठी अभिमानास्पद आहे. मी वयाच्या १३ व्या वर्षांपासून खेळत आहे पण राष्ट्रीय स्पर्धेचे जेतेपदप्रथमच मिळाले. हा विजय माझ्यासाठी सर्वकाही आहे. श्रीकांतविरुद्ध विशेष डावपेच आखले नव्हते. रोजच एकमेकांविरुद्ध खेळत असल्याने आम्हाला परस्परांचा गेम माहिती आहे. माझे लक्ष्य प्रत्येक गुणावर होते. प्रत्येक सामन्यागणिक आत्मविश्वास उंचावत जातो.ह्णह्ण- एच. एस. प्रणय, पुरुष एकेरीचा राष्ट्रीय विजेता

टॅग्स :BadmintonBadmintonSportsक्रीडाIndiaभारत