सोल : स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवालचे शुक्रवारी कोरिया ओपनमधून आव्हान संपुष्टात आले. जपानची नोजोमी ओकुहारा हिने जवळपास तासभर चाललेल्या उपांत्यपूर्व सामन्यात सायनाचा २१-१५, १५-२१, २०-२२ ने पराभव केला. सायनाचा ओकुहाराविरुद्ध हा सलग तिसरा पराभव होता.पाचवी मानांकित सायनाने चारवेळा ‘मॅचपॉर्इंट’ गमावले आणि हेच या सामन्यात निर्णायक ठरले. या सामन्याआधी उभय खेळाडूंमध्ये झालेल्या नऊ सामन्यात सायना सहावेळा विजेती होती. ओकुहाराने ३-० ने आघाडीसह शानदार सुरुवात केली, पण सायनाने मुसंडी मारून पहिल्या ब्रेकपर्यंत गुण १०-११ असे केले. ब्रेकनंतर सलग पाच गुणांची कमाई झाल्याने सायनाने १५-१२ अशा आघाडीसह गेम २१-१५ असा जिंकला.दुसऱ्या गेममध्ये ओकुहाराने सायनाला कुठली संधीच न देता हा गेम २१-१५ असा जिंकून सामना बरोबरीत आणला. निर्णायक गेममध्ये सायनाने ब्रेकपर्यंत ११-१० अशी आघाडीही होती. नंतर सायनाने पाच गुण घेत १६-१० अशी आघाडी घ्तली. यानंतर २०-१६ अशा फरकासह सायनाने मॅच पॉर्इंटही मिळविला पण ओकुहाराने दडपणातही सलग सहा गुणांची कमाई करीत २०-२२ अशी बाजी मारली.
कोरिया ओपनमधून सायनाचे आव्हान संपुष्टात; उपांत्यपूर्व लढतीत पराभव
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2018 06:45 IST