शहरं
Join us  
Trending Stories
1
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
2
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
3
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
4
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
5
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
6
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
7
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
8
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
9
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
10
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
11
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
12
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
13
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
14
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
15
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
16
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
17
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
18
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
19
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
20
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं

सिंधू-सायना पाठोपाठ जपान ओपन स्पर्धेत किदाम्बी श्रीकांत, एच. एस. प्रणयचे आव्हान संपुष्टात

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2017 15:03 IST

किदाम्बी श्रीकांत आणि एच. एस. प्रणय यांना शुक्रवारी जपान ओपन सुपरसिरीज बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीची उपांत्यपूर्व फेरीत पराभवाचा सामना करावा लागला.

ठळक मुद्देश्रीकांत आणि प्रणयला प्रतिस्पर्धी खेळाडूंनी सरळ गेममध्ये पराभूत केले. 

टोकियो -  भारताच्या किदाम्बी श्रीकांत आणि एच. एस. प्रणय यांचे शुक्रवारी जपान ओपन सुपरसिरीज बॅडमिंटन स्पर्धेत आव्हान संपुष्टात आले. पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. काल गुरुवारी पी. व्ही. सिंधू, सायना नेहवाल यांचे आव्हान संपुष्टात आले होते. श्रीकांत आणि प्रणयला प्रतिस्पर्धी खेळाडूंनी सरळ गेममध्ये पराभूत केले. 

45 मिनिट चाललेल्या सामन्यात चीनच्या शी युगूने प्रणयचा 15,21, 14-21 असा पराभव केला. पहिल्या गेममध्ये 20-13 अशी स्थिती असताना प्रणयने सलग दोन गुण घेतले. पण युगूने गेम पाँईट घेत पहिला गेम जिंकला. दुस-या गेममध्ये प्रणयने चांगली सुरुवात केली होती. दोघेही 5-5 असे बरोबरीत होते. पण त्यानंतर युगूने कामगिरी उंचावत प्रणयला पिछाडीवर टाकले व दुसरा गेम 14-21 ने जिंकत दिमाखात उपांत्यफेरीत प्रवेश केला. 

प्रणयने याआधीच्या सामन्यात आपल्या प्रतिस्पर्ध्यावर सरळ गेममध्ये विजय मिळवत तिस-या फेरीत प्रवेश केला होता. स्पर्धेत आठवे सीडींग मिळालेल्या  किदाम्बी श्रीकांतला वर्ल्ड चॅम्पियन व्हिक्टर एक्सेलसने 21-17,21-17 असे पराभूत केले. 

चोप्रा-सिक्की उपांत्यफेरीत प्रणव चोप्रा आणि सिक्की रेड्डीने मिश्र दुहेरीत कीम हा आणि सीउंग यांचा 21-18,9-21, 21-19 असा पराभव करुन उपांत्यफेरीत प्रवेश केला. 

गुरुवारी स्थानिक खेळाडू आणि जेतेपदाची प्रबळ दावेदार, विश्व चॅम्पियन ओकुहाराविरुद्ध तिस-यांदा खेळणा-या सिंधूला सर्वोत्कृष्ट खेळ करता आला नाही. अनेक चुकांचा फटका बसताच सिंधूचा ४७ मिनिटांत एकतर्फी लढतीत १८-२१, ८-२१ ने पराभव झाला. या दोघींमध्ये मागचा सामना ११० मिनिटे रंगला होता. त्या सामन्यातील संघर्ष आज दिसलाच नाही. त्याआधी कोरिया ओपनमध्ये सिंधूने ८३ मिनिटांचा थरार जिंकताना ओकुहाराचा पराभव करीत जेतेपदावर शिक्कामोर्तब केले होते.

लंडन ऑलिम्पिकची कांस्य विजेती सायना पाचवी मानांकित आणि ऑलिम्पिक चॅम्पियन स्पेनची कॅरोलिना मारिनविरुद्ध सुरुवातीला १४-१० आणि दुसºया गेममध्ये ६-४ अशा आघाडीनंतर १६-२१, १३-२१ अशा फरकाने पराभूत झाली.

टॅग्स :BadmintonBadminton