शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत किदाम्बी श्रीकांतची आगेकूच, उपांत्यपूर्व फेरीत धडक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2017 19:00 IST

जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय बॅडमिंटनपटूंनी आपला विजयी धडाका कायम ठेवला आहे. स्टार शटलर किदाम्बी श्रीकांतने आज झालेल्या सामन्यात डेन्मार्कच्या अॅण्टोन एन्टोंसेनचा 21-14, 21-18 अशा सरळ सेटमध्ये पराभव केला.

ग्लासगो, दि. 24 - जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय बॅडमिंटनपटूंनी आपला विजयी धडाका कायम ठेवला आहे. स्टार शटलर किदाम्बी श्रीकांतने आज झालेल्या सामन्यात डेन्मार्कच्या अॅण्टोन एन्टोंसेनचा 21-14, 21-18 अशा सरळ सेटमध्ये पराभव केला. या विजयासह किदाम्बी श्रीकांतने उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे. यूकेमध्ये ग्लासगो येथे ही स्पर्धा सुरु आहे. यंदा पहिल्यांदाच भारत सुवर्ण पदकाचा दावेदार म्हणून खेळत असून भारताची मदार पुरुष गटात श्रीकांतवर, तर महिला गटात पी. व्ही. सिंधूवर आहे. श्रीकांतने आपल्यावरील विश्वास सार्थ ठरवताना पहिल्या दिवशी सर्जीचा २१-१३, २१-१२ असा ३० मिनिटांहून कमी वेळेत धुव्वा उडवला. सर्वच क्षेत्रात वर्चस्व राखताना श्रीकांतने सर्जीला पुनरागमन करण्याची एकही संधी न देताना बाजी मारली. दुस-या फेरीत श्रीकांतने  फ्रान्सच्या लुकास कोर्वीचा पराभव केला होता. जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय बॅडमिंटनपटूंनी चांगली सुरुवात केली. अव्वल महिला बॅडमिंटनपटू सायना नेहवालने स्वित्झर्लंडच्या सबरीना जॅक्वेटवर सरळ दोन सेटमध्ये विजय मिळवला. तिने सबरीनावर 21-11, 21-12 असा विजय मिळवून उपउपांत्यपूर्वफेरीत प्रवेश केला. याव्यतिरीक्त बी. साई प्रणितने आपल्या प्रतिस्पर्ध्याची झुंज मोडून काढत पुढच्या फेरीत प्रवेश केला. त्यामुळे आगामी सामन्यांमध्ये भारताचे खेळाडू कशी कामगिरी करतात हे पहावं लागणार आहे.