शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

जपान ओपन - सिंधू ,सायनाचा पराभव; श्रीकांत आणि प्रणय उपांत्यपूर्वफेरीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2017 16:58 IST

आठवडाभरानंतर कोर्टवर परतलेले सायना नेहवाल आणि पी. व्ही. सिंधूचा जपान ओपन सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेच्या दुस-या फेरीत पराभवाला सामोर जाव लागले आहे. तर भारताच्याच श्रीकांत आणि प्रणय यांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळवत भारताच्या आशा जिंवत ठेवल्या आहेत. 

टोकिओ, दि. 21 - आठवडाभरानंतर कोर्टवर परतलेले सायना नेहवाल आणि पी. व्ही. सिंधूचा जपान ओपन सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेच्या दुस-या फेरीत पराभवाला सामोर जाव लागले आहे. तर भारताच्याच श्रीकांत आणि प्रणय यांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळवत भारताच्या आशा जिंवत ठेवल्या आहेत. 

जपान ओपन सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेच्या दुस-या फेरीत जपानच्या नोझोमी ओकुहारानं  18-21 आणि  8-21 अशा सरळ सेटमध्ये पराभव करत कोरिया ओपन सुपर सीरिज स्पर्धेतील पराभवाची परतफेड केली.  रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकणारी पी़ व्ही. सिंधूने उत्कृष्ठ खेळाचे प्रदर्शन करुन पहिल्या फेरीत जपानच्या मिनात्सु मितानीचा १२-२१, २१-१५, २१-१७ गुणांनी पराभव केला़ होता. 

विश्व चॅम्पियनशिपचे कांस्य जिंकणा-या सायना नेहवालनं स्पेनची कॅरोलिना मारीनबरोबर झालेल्या लढतीत 14-10नं आघाडी घेतली होती. पण मारीनने निर्णायक क्षणी आपला खेळ उंचावत सायनाचा 16-21 आणि 13-21 असा पराभव केला. सायनाने जांघेतील मांसपेशी ताणल्या गेल्यामुळे कोरिया ओपनमध्ये भाग घेतला नव्हता. तिने बुधवारी पहिल्या सामन्यात थायलंडची पोर्नपावी चोचुवोंग हिचा ३९ मिनिटांत २१-१७, २१-९ ने पराभव केला होता. 

किदाम्बी श्रीकांत आणि प्रणय  यांनी 325,000 डॉलर पारितेषिकाच्या या स्पर्धेत उपांत्यपूर्वफेरीत प्रवेश केला. इंडोनेशिया आणि ऑस्ट्रेलिया ओपन विजेता श्रीकांत याने दुसऱ्या फेरीत हाँगकाँगचा हू यूनचा पराभव केला. जागतिग मानंकनांत आठव्या स्छानावर असलेल्या श्रीकांतनं हू यूनचा 21-12, 21-11 असा पराभव करत अंतिम आठ खेळाडूमध्ये स्थान मिळवले आहे. श्रीकांतची उपांत्यपूर्वफेरीतील लढच डेनमार्कच्या विक्टर एक्सेलसन याच्याशी होणार आहे. 

अमेरिकन ओपन ग्रॅण्डप्रिक्स चॅम्पियन एच. एस. प्रणय याने पुरुष एकेरीत चीनच्या तायपे के सु जेन याचा 21-16, 23-21 असा पराभऴ करत पुढील फेरीत प्रवेश केला. त्याचा पुढील सामना जागतिक मानंकनांत दुसऱ्या स्थानावर असलेल्या चीनच्या शी युकी याच्याशी होणार आहे.  

टॅग्स :PV Sindhuपी. व्ही. सिंधू