शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

सलाम तुझ्या जिद्दीला.. थायलंड पॅरा बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या मानसीला कांस्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2018 21:19 IST

एका पायावरही बॅडमिंटन खेळला जाऊ शकतो आणि त्यात आंतरराष्ट्रीय भरारी घेता येते हे सगळ्या जगाला दाखवून दिलं ते भारताच्या मानसी जोशी हिने.

ठळक मुद्दे मानसीने पदक जिंकत इतरांना प्रेरणा ठरावी अशी कामगिरी केली.

सचिन कोरडे

बॅडमिंटनमध्ये सायना, सिंधूचे नाव आता सर्वपरिचित. पायांच्या हालचाली हे या खेळातील एक गमकच. पण एका पायावरही बॅडमिंटन खेळला जाऊ शकतो आणि त्यात आंतरराष्ट्रीय भरारी घेता येते हे सगळ्या जगाला दाखवून दिलं ते भारताच्या मानसी जोशी हिने.

मानसी ही पॅरा बॅडमिंटनपटू. तिने नुकतेच थायलंड येथे झालेल्या पॅरा बॅडमिंटन आंतरराष्ट्रीय स्पर्धेत कांस्यपदक पटकाविले. गळ्यात पदक पडावं असं ती सातत्याने स्वप्न बघायची. या स्वप्नाचा पाठलाग करण्यासाठी ती धडपडायची. अखेर तिची जिद्द फळाला आली. मानसीने पदक जिंकत इतरांना प्रेरणा ठरावी अशी कामगिरी केली.

बरोबर सहा वर्षांपूर्वी गुजरातची अभियंता असलेल्या २९ वर्षीय मानसीचा मुंबईत अपघात झाला. या अपघातात तिने एक पाय गमावला. पाय गमावल्याचा धक्का तिला जरूर बसला होता; मात्र तो तिच्या स्वप्नांना तुडवू शकला नाही. ती खेळण्याचा प्रयत्न करू लागली. ब्लेड फुटच्या साहाय्याने ती उभी झाली. अखेर तिने एसएल-३ या एकेरी गटात कांस्य जिंकले. आता ती जकार्ता येथे आॅक्टोबरमध्ये होणाऱ्या पॅरा आशियाई स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी उत्सुक आहे.

पदक पटकावल्यावर मानसी म्हणाली, " माझ्यापुढे आव्हानं खूप आहेत. सर्वात मोठे आव्हान होते ते या समाजाचे. समाजात आजही खूप अपंग खेळाडू आहेत, ज्यांना आधाराची गरज आहे. प्रत्येकालाच आधार मिळतोय असे नाही. त्यांनाही उभे राहायचे आहे. बºयाच प्रेरणादायी कथा आहेत. ज्या माझ्यासारख्यांना बळ देतात. त्यांना मी धन्यवाद देते. मला पूर्ण विश्वास आहे की, अपंगांमध्ये ज्ञान आणि कौशल्य आहे. याच्या आधारावर ते इतरांसाठीही प्रेरणादायी ठरूशकतात. गोपीचंद सरांकडून मी मार्गदर्शन घेतले. त्यांचे सहकार्य माझ्यासाठी खूप मोलाचे आहे."

दरम्यान, मानसीला लहानपणापासून बॅडमिंटन खेळायला आवडते. २०१५ पासूनती आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळत आहे. तिने २०१५ मध्ये विश्व चॅम्पियनशीपमध्ये मिश्र गटात  कांस्यपदक आणि त्यानंतर २०१७ मध्ये कांस्यपदक पटकाविले. स्पॅनिश आंतरराष्ट्रीय स्पर्धेतही तिने सुवर्णमय कामगिरी केली आहे.

टॅग्स :BadmintonBadmintonIndiaभारत