शहरं
Join us  
Trending Stories
1
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
2
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
3
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
4
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
5
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
6
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
7
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
8
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
9
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
10
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
11
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
12
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
13
ओल्या संकटावर पुन्हा धो-धो प्रहार; मराठवाड्यात २,८८० गावांना तडाखा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रालाही झोडपले
14
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
15
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
16
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
17
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
18
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
19
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
20
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 

श्रीकांतचे आव्हान संपुष्टात, प्रणव जेरी - चोप्रा आणि एन. सिक्की रेड्डी उपांत्य फेरीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2017 03:58 IST

किदाम्बी श्रीकांत आणि एचएस प्रणॉय या भारताच्या आघाडीच्या बॅडमिंटनपटूंचे जपान ओपन सुपर सिरिज स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. त्याचवेळी, मिश्र गटात प्रणव जेरी चोप्रा - एन. सिक्की रेड्डी या जोडीने शानदार कामगिरी करताना उपांत्य फेरीत धडक मारली आहे.

टोकियो : किदाम्बी श्रीकांत आणि एचएस प्रणॉय या भारताच्या आघाडीच्या बॅडमिंटनपटूंचे जपान ओपन सुपर सिरिज स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. त्याचवेळी, मिश्र गटात प्रणव जेरी चोप्रा - एन. सिक्की रेड्डी या जोडीने शानदार कामगिरी करताना उपांत्य फेरीत धडक मारली आहे.याआधीच महिला एकेरीमध्ये पी. व्ही. सिंधू आणि सायना नेहवाल यांचे आव्हान संपुष्टात आल्यानंतर भारतीयांच्या सर्व आशा श्रीकांत व प्रणॉय यांच्यावर होत्या. मात्र, पुरुष गटातही उपांत्यपूर्व फेरीतच भारताच्या पदरी निराशा आली. यंदाच्या वर्षी इंडोनेशिया आणि आॅस्टेÑलिया ओपन जेतेपद पटकावलेल्या श्रीकांतला जागतिक क्रमवारीत दुसºया स्थानी असलेला वर्ल्ड चॅम्पियन व्हिक्टर अ‍ॅक्सेलसनविरुद्ध पराभव पत्करावा लागला. सुमारे ४० मिनिटांपर्यंत रंगलेल्या या सामन्यात श्रीकांतला सरळ दोन गेममध्ये १७-२१, १७-२१ अशा पराभवास सामोरे जावे लागले. या शानदार विजयासह अ‍ॅलेक्सनने श्रीकांतविरुद्धचा आपला रेकॉर्ड ३-२ असा केला.संपुर्ण सामन्यात श्रीकांतने अनेक चुका केल्या. गुण मिळवण्याच्या सोप्या संधी गमावल्याचा मोठा फटका त्याला बसला. त्याचवेळी, अ‍ॅलेक्सनने आक्रमक पवित्रा घेताना जबरदस्त स्मॅशचा हल्ला करताना श्रीकांतला दबावाखाली ठेवले. अ‍ॅलेक्सनने मोठी आघाडी घेतल्यानंतर श्रीकांतने शानदार पुनरागमनही केले. परंतु, ऐनवेळी झालेल्या चुकांमुळे त्याला स्पर्धेतून गाशा गुंडाळावा लागला.मिश्र दुहेरी गटात प्रणव - रेड्डी यांनी भारतासाठी शानदार कामगिरी केली. प्रणव - रेड्डी यांनी तीन गेमपर्यंत रंगलेल्या चुरशीच्या सामन्यात बाजी मारताना कोरियाच्या सियुंग जाए सो आणि किम हा ना यांचे कडवे आव्हान २१-१९, ९-२१, २१-१९ असे परतावले. उपांत्य सामन्यात भारतीय जोडीपुढे जपानच्या ताकुरो होकी - सायाका हिरोता यांचे तगडे आव्हान असेल. (वृत्तसंस्था)>युकीचा धडाकाअमेरिकन ओपन चॅम्पियन एच. एस. प्रणॉयचा चीनच्या द्वितीय मानांकीत शी युकी याच्याविरुध्द ४५ मिनिटांपर्यंत रंगलेल्या सामन्यात १५-२१, १४-२१ असा पराभव झाला.>निर्णायक क्षणी चुकाउपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत श्रीकांत लौकिकानुसार खेळ करण्यात सपशेल अपयशी ठरला. पहिल्या गेममध्ये पुनरागमन करत चांगला खेळ दाखवल्यानंतर दुसºया गेममध्ये चुका मोक्याच्यावेळी त्याच्याकडून चुका झाल्या. श्रीकांतच्या चुकांचा अचूक फायदा अ‍ॅक्सेलसनने घेतला.