शहरं
Join us  
Trending Stories
1
'निवृत्त व्हा, कुठेही जा...तुम्हाला सोडणार नाही', राहुल गांधींचा थेट इशारा; कुणावर संतापले?
2
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर, ९ सप्टेंबरला होणार मतदान, निवडणूक आयोगाची घोषणा, असा आहे संपूर्ण कार्यक्रम
3
ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान भारताचा मोठा निर्णय; अमेरिकेकडून 'एफ ३५' जेट खरेदी करणार नाही!
4
"मोहन भागवत यांना पकडण्याचे आदेश होते"; मालेगाव स्फोट प्रकरणी माजी ATS अधिकाऱ्याचा दावा
5
पंचायत निवडणुकीत उतरले सोशल मीडिया इन्फ्लुएंसर; लाखो फॉलोअर्स पण पडलेली मते एकदा पाहाच
6
जागतिक अस्थिरता असतानाही सोने-चांदी स्वस्त! गुंतवणूकदारांसाठी सुवर्णसंधी? भविष्यात काय होणार?
7
PNB Housing Finance ला मोठा झटका, वरिष्ठांच्या राजीनाम्यानंतर शेअर १६% नं आपटला; लागलं लोअर सर्किट
8
चोर तर चोर वर शिरजोर! दागिन्यांच्या दुकानातून अंगठी चोरली, पोलिसांनी पकडल्यावर गुंडगिरी
9
सॅमसंगचे स्मार्ट टीव्ही बंद पडले, ग्राहक ठणाठणा ओरडू लागले; सर्व्हर डाऊनचे मेसेज दिसू लागले...
10
Pune Crime: कोयता काढला अन् सपासप वार करत सुटला; बारामती-इंदापूर धावत्या बसमध्ये प्रवाशावर हल्ला
11
Video: अश्विनी भावेंच्या अमेरिकेतील घरी अवतरली मराठी सिनेसृष्टी, अभिनेत्रीचा आनंद गगनात मावेना
12
बँकेत नोकरीची सुवर्णसंधी; IPBS ची १०,२७७ पदांवर मेगाभरती, महाराष्ट्रासाठी किती जागा?
13
आता PF काढणं झालं एकदम सोपं! फक्त 'हे' काम करा आणि कागदपत्रांशिवाय काही दिवसांत पैसे मिळवा!
14
ऑगस्ट २०२५ पासून बँकिंग आणि पैशांशी निगडीत नियमांत बदल; तुमच्यासाठी जाणून घेणं अतिशय महत्त्वाचं
15
पत्नीने पतीला नपुंसक म्हणणं गुन्हा आहे?; मुंबई हायकोर्टानं दिला महत्त्वाचा निर्णय
16
मुंबई आणि मालेगाव बॉम्बस्फोटात दुटप्पी राजकारण; केशव उपाध्ये यांचा काँग्रेसवर हल्लाबोल
17
अमेरिका एवढ्या खालच्या पातळीवर जाईल असे...; केव्हा केव्हा भारताविरोधात कारस्थाने रचलेली...
18
"मला कोंडून ठेवलं, पत्नीला दुखापत..."; आमदार चेतन आनंद यांचे एम्स कर्मचाऱ्यांवर गंभीर आरोप
19
जावई पहिल्यांदा सासरवाडीत आला, सासुने मस्त चिकनचा बेत आखला; विषबाधेमुळे दोघांचाही मृत्यू

China Open Super 1000 : सिंधू उपउपांत्यपूर्व फेरीत, सायना पराभूत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2018 19:26 IST

China Open Super 1000: ऑलिम्पिक व जागतिक स्पर्धेतील रौप्यपदक विजेत्या पी.व्ही. सिंधूने चीन ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला, तर सायना नेहवालला चुरशीच्या लढतीत पराभव स्वीकारावा लागला.

चांगझू : ऑलिम्पिक व जागतिक स्पर्धेतील रौप्यपदक विजेत्या पी.व्ही. सिंधूने चीन ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला, तर सायना नेहवालला चुरशीच्या लढतीत पराभव स्वीकारावा लागला. तिसऱ्या मानांकित सिंधूने या स्पर्धेत पहिल्या फेरीच्या लढतीत जपानच्या सेइना कावाकामीचा 21-15, 21-13 ने पराभव केला. राष्ट्रकुल स्पर्धेची सुवर्णपदक विजेती व 2014 मध्ये चीन ओपनचे जेतेपद पटकावणाऱ्या सायनाला 48 मिनिट रंगलेल्या पहिल्या फेरीच्या लढतीत कोरियाच्या सुंग जी ह्यूनविरुद्ध 22-20, 8-21, 14-21 ने पराभव स्वीकारावा लागला. मनू अत्री व बी. सुमित रेड्डी या राष्ट्रीय विजेत्या जोडीने लियाओ मिन चून व सू चिंग हेंग या चिनी ताइपेच्या जोडीचा 39 मिनिटांमध्ये 13-21, 21-13, 21-12 ने पराभव करीत दुसरी फेरी गाठली. सिंधू व कावाकामी यांची लढत सुरुवातीला चुरशीची झाली. पण त्यानंतर भारतीय खेळाडूने 13-7 ने आघाडी घेतली. सिंधूने रॅलीमध्ये वर्चस्व गाजवले आणि पहिला गेम सहज जिंकला. दुस:या गेममध्ये सिंधूने शानदार सुरुवात करताना 6-क् अशी आघाडी घेतली. कावाकामीने पुनरागमन करताना स्कोअर 8-10 करण्यात यश मिळवले. भारतीय खेळाडूने ब्रेकर्पयत 11-9 अशी आघाडी घेतली होती. ब्रेकनंतर सिंधूने 15-11 ची आघाडी घेतली आणि 20-12 च्या स्कोअरवर 8 मॅच पॉईंट मिळवत सहज विजय साकारला.  

टॅग्स :Saina Nehwalसायना नेहवालPV Sindhuपी. व्ही. सिंधूBadmintonBadminton