शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

पी. व्ही. सिंधू, श्रीकांत यांच्यापुढे कामगिरी उंचावण्याचे आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2019 01:50 IST

माजी चॅम्पियन पी.व्ही. सिंधू आणि किदाम्बी श्रीकांत फॉर्ममधील चढ-उतारातून सावरत इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेत पुन्हा एकदा जेतेपद पटकावण्याच्या निर्धाराने सहभागी होणार आहेत.

नवी दिल्ली : माजी चॅम्पियन पी.व्ही. सिंधू आणि किदाम्बी श्रीकांत फॉर्ममधील चढ-उतारातून सावरत इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेत पुन्हा एकदा जेतेपद पटकावण्याच्या निर्धाराने सहभागी होणार आहेत. पोटाच्या त्रासामुळे सायना नेहवालने देशातील या अव्वल बॅडमिंटन स्पर्धेतून माघार घेतल्यानंतर मंगळवारपासून सुरु होत असलेल्या या स्पर्धेत भारताची भिस्त सिंधू व श्रीकांत यांच्यावर राहील.गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये विश्व टूर फायनल्सचे जेतेपद पटकावणारी आॅलिम्पिक रौप्यपदक विजेत्या सिंधूला चीनच्या अव्वल मानांकित व गत आॅल इंग्लंड चॅम्पियन चेन यूफेईच्या माघारीमुळे विजयाचा प्रबळ दावेदार मानले जात आहे. जपानच्या खेळाडूंच्या अनुपस्थितीचाही सिंधूला लाभ मिळण्याची शक्यता आहे. सिंधूने नव्या मोसमात इंडोनेशिया मास्टर्सच्या क्वार्टर फायनलमध्ये स्थान मिळवले होते, पण प्रतिष्ठेच्या आॅल इंग्लंडमध्ये ती पहिल्याच फेरीत गारद झाली होती. २०१७ मध्ये जेतेपद पटकावल्यानंतर सिंधूने गेल्या वर्षीही इंडिया ओपनची अंतिम फेरी गाठली होती. या कामगिरीपासून प्रेरणा घेण्यासाठी ती प्रयत्नशील असेल.सिंधू आपल्या मोहिमेची सुरुवात मायदेशातील सहकारी मुग्धा आग्रेविरुद्धच्या लढतीने करणार असून उपांत्यपूर्व फेरीत तिची लढत आठव्या मानांकित डेन्मार्कच्या मिया ब्लिकफेल्टसोबत होऊ शकते. या लढतीत विजय मिळवल्यानंतर तिची गाठ चीनच्या तिसऱ्या मानांकित बिंगजाओसोबत पडू शकते. या विश्व टूर सुपर ५०० स्पर्धेत रुशाली गम्मादी व साई उत्तेजिता राव चुका यांच्यासारख्या युवा खेळाडूही भारताचे प्रतिनिधित्व करतील.दुसरीकडे, ही स्पर्धा तिसऱ्या मानांकित श्रीकांतसाठी महत्त्वाची आहे. कारण गेल्या १७ महिन्यात त्याला कोणतेही जेतेपद जिंकता आले नाही. गत चॅम्पियन व अव्वल मानांकित चीनच्या शी युकीने माघार घेतल्यानंतर २०१५ चा विजेता श्रीकांत व माजी विश्व चॅम्पियन डेन्मार्कचा व्हिक्टर एक्सेलसन जेतेपदाचे प्रबळ दावेदार आहेत. एक्सेलसनने सलग तीन वर्षे अंतिम फेरी गाठल्यानंतर २०१७ मध्ये जेतेपद पटकावले होते. (वृत्तसंस्था)श्रीकांतने आपले पहिले जेतेपद २०१७ मध्ये फ्रेंच ओपनमध्ये जिंकले होते. श्रीकांत सलामीला हाँगकाँगच्या वोंग विंग की विन्सेटविरुद्ध खेळेल. त्यानंतर त्याला देशबंधू समीर वर्मा किंवा बी. साई प्रणीत यांच्या कडव्या आव्हानाला सामोरे जाण्याची शक्यता आहे.

टॅग्स :PV Sindhuपी. व्ही. सिंधूBadmintonBadminton