शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
2
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
3
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
4
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
5
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
6
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
7
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
8
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
9
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
10
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
11
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
12
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
13
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
14
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
15
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
16
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
17
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
18
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
19
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
20
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू

BWF World C’ships 2019 final : सुवर्णपदक जिंकून सिंधूनं आईला दिलं बर्थ डे गिफ्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2019 18:36 IST

जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धा : भारताच्या पी. व्ही. सिंधूने अखेरीस अंतिम फेरीतील अपयश मागे सोडून जेतेपदाला गवसणी घातली.

स्वित्झर्लंड, जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धा : भारताच्या पी. व्ही. सिंधूने अखेरीस अंतिम फेरीतील अपयश मागे सोडून जेतेपदाला गवसणी घातली. जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत तिसऱ्यांदा अंतिम फेरीत प्रवेश करणाऱ्या सिंधूने यावेळी जेतेपदाचा दुष्काळ संपवला. तिने जपानच्या नोझोमी ओकुहाराला नमवून सुवर्णपदक नावावर केले. जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत सुवर्मपदक जिंकणारी सिंधू ही पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे. विशेष म्हणजे आज सिंधूच्या आईचा वाढदिवस आहे आणि हे सुवर्णपदक आईला बर्थ डे गिफ्ट असल्याचे मत सिंधूनं सामन्यानंतर व्यक्त केले.

सिंधूने पहिल्या गेमपासूनचा आक्रमक खेळ करताना ओकुहाराला डोकं वर काढूच दिले नाही. गणपती बाप्पा मोरया आणि वंदे मातरम् च्या गजर स्वित्झर्लंडमध्येही दुमदुमला. सिंधूच्या आक्रमक खेळाने तिच्या पाठीराख्यांचा उत्साह आणखी वाढवला. सिंधूने नेट प्लेसिंग आणि परतीच्या फटक्यांचा सुरेख खेळ करताना अवघ्या 16 मिनिटांत पहिला गेम 21-7 असा नावावर केला. सिंधूने पहिल्या गेममध्ये सलग 8 गुणांची कमाई केली. 

दुसऱ्या गेममध्येही सिंधूचा दबदबा कायम राहिला. ओकुराहा प्रचंड तणावाखाली जाणवली. त्याच्याच फायदा उचलत सिंधूनं संपूर्ण कोर्टवर ओकुहाराला नाचवले. सिंधूने अवघ्या सहा मिनिटांत 7-2 अशी आघाडी घेत ओकुहारावरील दडपण आणखी वाढवले. ही आघाडी तिनं 11-4 अशी वाढवत जेतेपदाच्या दिशेनं मोठी झेप घेतली. सिंधूने प्रचंड आत्मविश्वासानं खेळ करताना ओकुहाराचा सहज पराभव केला. सिंधूनं हा सामना 21-7, 21-7 असा जिंकला. 

सामन्यानंतर सिंधू म्हणाली,'' या क्षणाची मी आतुरतेनं वाट पाहत होती. हा विजय माझ्यासाठी खास आहे. आजच्याच दिवशी हा विजय मिळवल्यानं आनंद द्विगुणित झाला आहे. कारण आज माझ्या आईचा वाढदिवस आहे. ही तिला माझ्याकडून मिळालेली आतापर्यंतची सर्वोत्तम भेट असेल.'' जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील पदकविजेते भारतीय1983 - प्रकाश पादुकोण ( पुरुष एकेरी) - कांस्यपदक2011 - ज्वाला गट्टा व अश्विनी पोनप्पा ( महिला दुहेरी) - कांस्यपदक2013 - पी. व्ही. सिंधू ( महिला एकेरी) - कांस्यपदक2014 -   पी. व्ही. सिंधू ( महिला एकेरी) - कांस्यपदक2015 - सायना नेहवाल ( महिला एकेरी) - रौप्यपदक2017 - पी. व्ही. सिंधू ( महिला एकेरी) - रौप्यपदक2017- सायना नेहवाल ( महिला एकेरी) - कांस्यपदक2018 - पी. व्ही. सिंधू ( महिला एकेरी) - रौप्यपदक2019 - बी साई प्रणित ( पुरुष एकेरी) - कांस्यपदक2019 - पी. व्ही. सिंधू ( महिला एकेरी) - सुवर्णपदक

टॅग्स :PV Sindhuपी. व्ही. सिंधूBadmintonBadminton