शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
2
आजचे राशीभविष्य - १४ डिसेंबर २०२५, कार्य साफल्याचा दिवस, नवे काम सुरू कराल
3
राज्यातील सर्व २९ महापालिकांची निवडणूक होणार एकाच टप्प्यात! ५० टक्के आरक्षण मर्यादेचा अडसर नाही
4
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
5
पीएचडी शिष्यवृत्तीला आता शिस्तीची चौकट; अर्थ खात्याकडून पैसे न मिळाल्याने शिष्यवृत्तीची रक्कम रखडली!
6
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
7
डोंबिवलीत पाच वर्षांनंतर पुन्हा गुलाबी रस्ता; प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर
8
चार्टर्ड प्लेनमधील 'त्या' प्रवासामुळे भाजपच्या नेत्यांना वरिष्ठांचे फटके!
9
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
10
निधीटंचाई; शेततळ्यांना सरकारनेच दिली कबुली; कृषिमंत्र्यांनी दिली माहिती : रक्कम देताना हात आखडता
11
५० एकरहून जास्त भूखंडांवर क्लस्टर रिडेव्हलपमेंट प्रकल्प; उपमुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा
12
इसिसच्या मॉड्युलची पडघ्यात खैराच्या लाकडाची मोठी तस्करी; ईडीने केलेल्या तपासातून माहिती आली उजेडात
13
'मतचोरी'त भाजपच्या माजी आमदारासह मुलाचा सहभाग; आळंद येथील घटनेप्रकरणी सात जणांवर आरोपपत्र
14
झोपडपट्ट्यांत मूल विकणाऱ्या टोळ्या सक्रिय; हरवलेल्या मुलांच्या शोधासाठी 'ऑपरेशन मुस्कान'
15
इंडिगोचे पंख आवळले, ५९ कोटींचा ठोठावला दंड! आदेशाला आव्हान देण्याचा विमान कंपनीचा विचार
16
संसदेवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण; २००१ मध्ये झाला होता हल्ला
17
ज्येष्ठांच्या संरक्षणाबाबत पोलिसांचे वर्तन बेफिकीर; वृद्ध दाम्पत्याला मुलाकडून मारहाणप्रकरणी हायकोर्टाचे पोलिसांवर ताशेरे
18
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
19
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
20
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
Daily Top 2Weekly Top 5

#BestOf2017: बॅडमिंटनमध्ये या खेळाडूंनी गाजवले वर्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2017 11:52 IST

गेल्या काही वर्षांपासून बॅडमिंटनमध्ये भारताने चांगलीच प्रगती केली आहे. सायना नेहवालच्या उदयानंतर पी. व्ही. सिंधू, किदाम्बी श्रीकांत, एच. एस. प्रणॉय, बी. साईप्रणीत यांसारख्या अनेक खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर तिरंगा अभिमानाने फडकावला.

गेल्या काही वर्षांपासून बॅडमिंटनमध्ये भारताने चांगलीच प्रगती केली आहे. सायना नेहवालच्या उदयानंतर पी. व्ही. सिंधू, किदाम्बी श्रीकांत, एच. एस. प्रणॉय, बी. साईप्रणीत यांसारख्या अनेक खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर तिरंगा अभिमानाने फडकावला. सायनानंतर आतंरराष्ट्रीय स्तरावरील चीनच्या वर्चस्वाला हादरे देण्याचे काम सिंधू आणि श्रीकांत यांनी चोखपणे बजावले. २०१७ मध्येही सायनासह या दोघांनी चीनसह, मलेशिया, कोरिया, डेन्मार्क यासारख्या बलाढ्य देशातील खेळाडूंना झुंजावले.>पी. व्ही. सिंधू हिने नवे कीर्तिमान प्राप्त केले; पण किदाम्बी श्रीकांत याने सर्वाधिक विजेतेपद मिळवत बॅडमिंटनला अधिक उंची गाठून दिली. ज्यामुळे हे सत्र पुरुष खेळाडूंसाठी यशस्वीपूर्ण ठरले. या वर्षी जगभरातील स्टेडियमवर अनेकवेळा भारताचे राष्ट्रगीत वाजताना दिसले, जी अभिमानाची बाब ठरली. कारण सिंधू आणि श्रीकांत यांनी एलिट बॅडमिंटन स्पर्धेच्या पोडियममध्ये जागा मिळवली. सिंधूने तीन विजेतेपदे आणि तीन रौप्यपदके पटकावत विश्वातील सर्वाेत्कृष्ट खेळाडूमध्ये स्थान मिळवले. दुसरीकडे, श्रीकांतने अपेक्षेहून अधिक चांगला खेळ करीत चार विजेतेपेदे आणि एक उपविजेतेपद पटकाविले.>२०१७ मध्ये पुरुष खेळाडू हे महिला खेळाडूंच्या तुलनेत आघाडीवर राहिले. ज्यामध्ये बी. साई प्रणीत आणि एच.एस. प्रणय यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट खेळ केला. सायना नेहवालनेही जबरदस्त पुनरागमन केले. दुहेरीतही खेळाडूंनी छाप पाडली. तौफिक हिदायतला प्रशिक्षण दिलेल्या इंडोनेशियाच्या मुल्यो हंडोयो यांना भारताचे प्रशिक्षक म्हणून नियुक्त करण्यात आले. गेल्या वर्षी गुडघ्याच्या दुखापतीमुळे चार महिने बाहेर राहिलेल्या २४ वर्षीय श्रीकांतने एप्रिलमध्ये सिंगापूर, इंडोनेशिया आणि आॅस्ट्रेलियामध्ये सलग तीन फायनलमध्ये जागा मिळवली. तो सिंगापूर फायनलमध्ये पराभूत झाला. मात्र, इंडोनेशिया आणि आस्ट्रेलियामध्ये जिंकत अव्वल १० मध्ये स्थान मिळवले. तो सर्वाधिक कमाई करणाºयांच्या यादीतही सामील झाला. श्रीकांत विश्व चॅम्पियनशीपच्या उपांत्यपूर्व फेरीत पराभूत झाला. मात्र, आॅक्टोबरमध्ये सलग आठवड्यात डेन्मार्क आणि फ्रान्समध्ये किताब जिंकण्यात तो यशस्वी ठरला. जागतिक क्रमवारीत दुसºया स्थानावर पोहचून श्रीकांतने दुबई फायनल्समध्ये जागामिळवली.>राष्ट्रीय चॅम्पियनशीपच्या फायनलपर्यंतच्या प्रवासादरम्यान श्रीकांतने बºयाच दुखापतींचा सामना केला. या दुखापतींमुळे तो दोन स्पर्धा खेळू शकला नाही. प्रणीत आणि प्रणय यांनीही प्रभावित केले. प्रणीतने सिंगापूर ओपन शिवाय आॅल इंडिया फायनलमध्ये श्रीकांतला पराभूत करीत सुपर सिरिज किताब जिंकला.>प्रणीतने सहा आठवड्यांनंतर थायलंड ग्रां प्री गोल्ड जेतेपद पटकावले. याचदरम्यान प्रणॉयने मलेशियाचा महान खेळाडू लीग चोंग आणि चीनचा लोंग यांना सलग दोन दिवस पराभूत करीत इंडोनेशिया ओपनच्या सेमीफायनलमध्ये प्रवेश केला होता. प्रणॉयने डेन्मार्क ओपनमध्येही चोंग वेईचा पराभव केला आणि करिअरमधील सर्वाेत्कृष्ट १० वे मानांकन प्राप्त केले.>सायनाने शानदार पुनरागमन करीत मलेशिया मास्टर्स ग्रां प्री गोल्ड जेतेपदावर नाव कोरले. त्यानंतर विश्व चॅम्पियनशीपमध्ये कांस्यपदकही पटकाविले. त्याचवेळी सायनाने राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत सिंधूचा पराभव करुन जेतेपदाला गवसणी घातली.>युवा खेळाडूंमध्ये १६ वर्षीय लक्ष्य सेनने इंडिया इंटरनॅशनल सीरीज आणि युरेशिया बल्गेरीया ओपन स्पर्धेचे जेतेपद पटकावत स्वत:ला सिद्ध केले. यानंतर मुंबईत झालेल्या इंडिया इंटरनॅशनल स्पर्धेत तो उपविजेताही ठरला.>आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळाडूंनी केलेल्या चमकदार कामगिरीमुळे राष्ट्रीय प्रशिक्षक पुलेल्ला गोपीचंद यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला. मात्र त्याचवेळी, जागतिक ज्युनिअर अजिंक्यपद स्पर्धेसाठी संघात त्यांची मुलगी गायत्री हीच्या झालेल्या निवडीवर मोठा वादही उपस्थित झाला होता.

टॅग्स :BadmintonBadmintonBest of 2017बेस्ट ऑफ 2017PV Sindhuपी. व्ही. सिंधूSaina Nehwalसायना नेहवाल