शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर काँग्रेसनं सांगावं, 'याचा' अर्थ काय?" मनमोहन सिंगांच्या वक्तव्यावरून अमित शाह यांचा हल्लाबोल
2
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
3
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
4
प्रभू श्रीराम आणि शिव शंकरांवरील खर्गेंचं 'ते' वक्तव्य, पंतप्रधान मोदी म्हणाले अत्यंत 'खतरनाक'; योगीही भडकले
5
India's T20 World Cup Squad Press Conference - शिवम दुबेची निवड का केली? रोहित शर्माने कारण सांगितलं, पण प्लेइंग इलेव्हनबाबत मोठं विधान 
6
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
7
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
8
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
9
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
10
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
11
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
12
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
13
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
14
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
15
चेन्नईतील श्रीदेवीचं आलिशान घर! जिथे जान्हवीचं गेलं बालपण, आता राहता येणार रेन्टवर
16
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
17
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
18
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
19
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
20
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल

बॅडमिंटन प्रशिक्षक किमचा राजीनामा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2019 1:40 AM

सिंधूच्या विश्वविजेतेपदामध्ये दिले होते मोलाचे योगदान

नवी दिल्ली : स्टार पी. व्ही. सिंधूला विश्वविजेतेपदात मार्गदर्शन करणारी भारतीय महिला एकेरी संघाची बॅडमिंटन प्रशिक्षक किम जी ह्यून हिने वैयक्तिक कारणामुळे मंगळवारी राजीनामा दिला. टोकियो आॅलिम्पिकला वर्षभराहून कमी कालावधी शिल्लक असल्याने भारताला लवकरच किमचा पर्याय शोधावा लागेल. बुसान येथे वास्तव्य करणाऱ्या ४५ वर्षीय किमला पती रिची मेरच्या उपचारासाठी न्यूझीलंडला जावे लागेल. काही दिवसांआधी रिचीला ‘मस्तिष्काघात’ झाला होता. भारतीय बॅडमिंटन संघटनेने याचवर्षी किमसोबत करार केला होता. तिच्या मार्गदर्शनात सिंधूने जागतिक स्पर्धेचे सुवर्ण जिंकले.मुख्य राष्ट्रीय प्रशिक्षक पुलेल्ला गोपीचंद म्हणाले, ‘किमने राजीनामा दिला, हे खरे आहे. तिचा पती आजारी आहे. आम्ही विश्व अजिंक्यपद स्पर्धेमध्ये असताना त्याला मस्तिष्काघात झाल्याचे कळताच किम परतली होती. पतीचा आजार बरा होण्यास चार ते सहा महिने लागू शकतात.’ सिंधू म्हणाली,‘आता माझ्याकडे किमच्या अनुपस्थितीत पुढचा विचार करण्यापेक्षा दुसरा पर्याय नाही. किमला जावे लागले हे दुर्दैवी आहे. तिच्या पतीला दीर्घायुष्य लाभो, अशी प्रार्थना करते. किमसोबत माझे सलोख्याचे संबंध होते. आता नव्याने सुरुवात करावी लागेल. खेळाडूच्या आयुष्याचा हा भाग आहे. गोपी सरांच्या मार्गदर्शनात कठोर मेहनत करावीच लागेल.’ (वृत्तसंस्था)

टॅग्स :PV Sindhuपी. व्ही. सिंधू