शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

Asian Games 2018: पी. व्ही. सिंधूला रौप्यपदक; 'सोनेरी इतिहासा'चं स्वप्न अधुरं

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2018 13:58 IST

Asian Games 2018: अंतिम फेरीत दबावाचा सामना करण्यात अपयशी ठरण्याचे पी. व्ही. सिंधूचे सत्र आशियाई स्पर्धेतही कायम राहिले.

जकार्ता, आशियाई क्रीडा स्पर्धाः अंतिम फेरीत दबावाचा सामना करण्यात अपयशी ठरण्याचे पी. व्ही. सिंधूचे सत्र आशियाई स्पर्धेतही कायम राहिले. चायनीज तैपेईच्या ताय त्झु यिंगने 21-13, 21-16 अशा फरकाने विजय मिळवून सुवर्णपदक नावावर केले. सिंधूला पुन्हा एकदा रौप्यपदकावरच समाधान मानावे लागले. 

मंगळवारच्या लढतीपूर्वी सिंधूची यिंगविरूद्घ  जय-परायजयाची आकडेवारी 3-9 अशी आहे. चायनीज तैपेईच्या खेळाडूने सुरुवातच आक्रमणाने केली. तिने दमदार स्मॅश आणि नेट प्लेसिंगचा सुरेख खेळ करताना अवघ्या 16 मिनिटांत पहिला गेम 21-13 असा जिंकला. या गेममध्ये सिंधूने कमबॅक करण्याचे प्रयत्न केले, परंतु तिला नशीबाची साथ लाभली नाही. जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या ताय त्झु यिंने 11-7 अशी आघाडी घेतली होती. त्यात सातत्याने गुणांची भर घालताना तिने हा गेम घेतला.

दुसऱ्या गेममध्ये सिंधुकडून सुरेख खेळ झाला. पिछाडीवर पडूनही तिने कमबॅक करण्याचे प्रयत्न सुरूच ठेवले. यिंगने हा गेम 21-16 असा जिंकून जेतेपद निश्चित केले. आशियाई स्पर्धेत रौप्यपदक जिंकणारी सिंधू ही पहिली भारतीय बॅडमिंटनपटू आहे. 

टॅग्स :Asian Games 2018आशियाई क्रीडा स्पर्धाPV Sindhuपी. व्ही. सिंधूBadmintonBadminton