शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

Asian Games 2018: बॅडमिंटनमधले भारताचे पदक हुकले, जपानकडून हार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2018 11:33 IST

Asian Games 2018: भारतीय महिला संघाला बॅडमिंटनचे पदक निश्चित करण्यासाठी केवळ एका विजयाची आवश्यकता होती, परंतु त्यांना तोही मिळवण्यात अपयश आले.

जकार्ता - भारतीय महिला संघाला बॅडमिंटनचे पदक निश्चित करण्यासाठी केवळ एका विजयाची आवश्यकता होती, परंतु त्यांना तोही मिळवण्यात अपयश आले. ऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्या पी. व्ही. सिंधूने भारताला विजयी सुरूवात करून दिली, परंतु अन्य खेळाडूंनी जपानसमोर शरणागती पत्करली. जपानने 3-1 अशा विजयासह उपांत्य फेरीत प्रवेश करताना निदान कांस्यपदक निश्चित केले आहे.  ऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्या पी. व्ही. सिंधूने महिली एकेरीच्या लढतीत जपानच्या अकाने यामागुचीवर 21-18, 21-19 असा विजय साजरा करून भारताला आघाडी मिळवून दिली आहे. मात्र, दुहेरीत सारा सुनील आणि एन सिक्की रेड्डी यांना पराभप पत्करावा लागल्याने जपानने सामन्यात 1-1 असे पुनरागमन केले आहे. जपानच्या सयाका हिरोटा आणि युकी फुकुशिमा यांनी 21-15, 21-6 असा सहज विजय मिळवला. सर्वांच्या नजरा महिला एकेरीच्या लढतीकडे वळल्या. सायना नेहवालने संघर्षपूर्ण खेळ करताना भारताच्या आशा जीवंत राखण्याचा प्रयत्न केला, परंतु नोझोमी ओकुहाराचे कडवे तिला परतवता आले नाही. दुसऱ्या सेटमध्ये सायनाने 8-11 आशा पिछाडीवरून मुसंडी मारताना 25-23 अशा विजयासह सामना 1-1 असा बरोबरीत आणला, परंतु तिला पुढील सेटमध्ये 16-21 अशी हार मानावी लागली. ओकुहाराने जपानला 2-1 अशी आघाडी मिळवून दिली.दुसऱ्या दुहेरीत सिंधू आणि अश्विनी पोनप्पा यांच्याकडून चमत्काराची अपेक्षा होती, मिसाकी मात्सुटोमो व अयाका ताकाहाशी या जोडीने भारताचे आव्हान संपुष्टात आणले. 

टॅग्स :Asian Games 2018आशियाई स्पर्धाPV Sindhuपी. व्ही. सिंधूBadmintonBadminton