शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Asian Games 2018 : सिंधू हे सुवर्णपदक तुझेच; कट्टर प्रतिस्पर्धीचा भारतीय खेळाडूवर विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2018 11:28 IST

Asian Games 2018: जकार्ता येथे सुरू असलेल्या आशियाई स्पर्धेत बॅडमिंटनमध्ये सायना नेहवाल आणि पी. व्ही. सिंधू यांच्यावर पदक पटकावण्याचा भार आला आहे.

मुंबई-  जकार्ता येथे सुरू असलेल्या आशियाई स्पर्धेत बॅडमिंटनमध्ये सायना नेहवाल आणि पी. व्ही. सिंधू यांच्यावर पदक पटकावण्याचा भार आला आहे. पुरुष एकेरीत श्रीकांत किदम्बीचे आव्हान संपुष्टात आल्यानंतर सर्वांचे लक्ष लागले आहे ते महिला एकेरीच्या सामन्यांकडे. ज्यात सायना व सिंधू या दोघी भारतीयांचे अपेक्षांचे ओझे वाहत आहेत. पण सध्याचा फॉर्म पाहता सिंधू भारताला यंदा सुवर्णपदक नक्की जिंकून देइल असा विश्वास आहे. 

भारताला मागील 14 आशियाई स्पर्धेत एकदाही कांस्यपदकाची वेस ओलांडता आलेली नाही. 2014च्या इंचाँन आशियाई स्पर्धेत भारतीय बॅडमिंटनपटूंना केवळ एकाच ( कांस्य) पदकावर समाधान मानावे लागले होते. पण त्यानंतरच्या चार वर्षांत विशेषतः चीन, जपान, कोरिया यांचे वर्चस्व असलेल्या बहुतांश स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंनी आपले नाणे खणखणीत वाजवले. सिंधू त्यात आघाडीवर आहे. 

ऑलिम्पिकमधील रौप्यपदक आणि जागतिक स्पर्धेतील चार पदकं ( दोन रौप्य व दोन कांस्य) ही त्याचीच साक्ष देतात. त्यामुळे कोर्टवरील तिची कट्टर वैरी कॅरोलिना मारिन हीनेही यंदा सिंधू सुवर्णपदक जिंकेलच असा विश्वास व्यक्त केला आहे. काय म्हणाली मारिन, पाहा हा व्हिडिओ..रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत मारिनने सुवर्णपदकाच्या लढतीत सिंधूला पराभूत केले होते. त्यानंतर या दोन्ही खेळाडूंत चांगली मैत्री झाली. नुकत्याच झालेल्या जागतिक स्पर्धेतही स्पेनच्या मारिनने भारतीय खेळाडूला नमवून जेतेपद नावावर केले होते.  

टॅग्स :PV Sindhuपी. व्ही. सिंधूAsian Games 2018आशियाई स्पर्धाSportsक्रीडा