शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

वाहन परवान्यासाठी वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करू शकता आता ऑनलाइन!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2021 11:17 IST

medical certificate for driving license : वाहन चालकांना परवान्यावाचून खोळंबून रहावे लागू नये म्हणून ऑनलाइन लायसन्स देण्यास सुरुवात केली आहे.

मुंबई : कोरोनाकाळात सर्वत्र स्पर्शविरहित यंत्रणांचा वापर केला जात असताना राज्याचा परिवहन विभागही त्यात मागे नाही. या संकटकाळात वाहन चालकांना परवान्यावाचून खोळंबून रहावे लागू नये म्हणून ऑनलाइन लायसन्स देण्यास सुरुवात केली आहे.

आतापर्यंत राज्यभरात अडीच लाखांहून अधिक अर्जदारांनी त्याचा लाभ घेतला आहे. त्याशिवाय वैद्यकीय प्रमाणपत्राची प्रक्रियाही डॉक्टरांमार्फत ऑनलाइन केल्याने मानवी हस्तक्षेप कमी होऊन पारदर्शकता आल्याचे परिवहन विभागाकडून सांगण्यात आले.

मानवी हस्तक्षेप कमी होऊन संपूर्ण प्रक्रियेत पारदर्शकता आली आहे. अर्ज प्रक्रिया आधारकार्डशी संलग्न केल्यामुळे मध्यस्थांचा प्रश्न नाही. उमेदवारांनी घरबसल्या परीक्षा द्यायची, उत्तीर्ण झाल्यानंतर कागदपत्रांची पडताळणी होऊन लायसन्स मिळून जाते, अशी माहिती परिवहन उपायुक्त राजेंद्र मदने यांनी दिली.

तांत्रिक अडथळे येतात का?आधार कार्ड अपडेट केलेले नसलेल्यांना अर्ज करताना तांत्रिक अडथळे येतात. म्हणजे मोबाइल क्रमांक जोडला नसल्याने ओटीपी किंवा अन्य प्रक्रिया न होणे, असे प्रकार घडतात. आधार अपडेट अपडेट असलेल्यांना कोणत्याही प्रकारच्या समस्या जाणवत नाहीत, अशी माहिती देण्यात आली.

वैद्यकीय प्रमाणपत्र प्रत्येकाला सादर करावे लागते का?- ट्रान्सपोर्ट लायसन्स, ४५ वर्षांवरील व्यक्ती आणि परवान्याच्या नुतीकरणाकरीता वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करावे लागते.- ही प्रक्रियाही आता ऑनलाइन करण्यात आली आहे. त्यासाठी इंडियन मेडिकल असोसिएशनच्या मान्यतापात्र एमबीबीएस डॉक्टरांची मदत घेतली जाणार आहे.- अर्जदाराची तपासणी केल्यानंतर हे डॉक्टर प्रमाणपत्र थेट आमच्या संकेतस्थळावर ऑनलाइन अपलोड करतील. त्यामुळे पारदर्शक व्यवहार होण्यास मदत होईल.- नवी लायसन्ससाठी वैद्यकीय प्रमाणपत्र लागत नाही. त्यांना केवळ सेल्फ डिक्लरेशन फॉर्म जोडावा लागतो.

किती वयापर्यंत लायसन्स मिळते?वाहन परवाना मिळवण्यासाठी संबंधित अर्जदाराने वयाची १८ वर्षे पूर्ण केलेली असावीत. १८ वर्षांनंतर कुणीही लायसन्स काढू शकतो. ४५ वर्षांवरील व्यक्तींना मात्र लायसन्स मिळवण्यासाठी वैद्यक्तीय प्रमाणपत्र (शारीरक क्षमता तपासण्यासाठी) सादर करावे लागते.

ऑनलाइन लायसन्स पद्धत पारदर्शक कारभारासाठी फायदेशीर ठरत आहे. अर्ज खोळंबून राहू नयेत यासाठी दररोज आढावा घेतला जात आहे. शिवाय मानवी हस्तक्षेप जास्तीत जास्त कमी करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.- राजेंद्र मदने, परिवहन उपायुक्त

टॅग्स :AutomobileवाहनMumbaiमुंबई