शहरं
Join us  
Trending Stories
1
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
4
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
6
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
7
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
8
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
9
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
10
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
11
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
12
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
13
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
14
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
15
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
16
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
17
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
18
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
19
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!

Yezdi कंपनी आठवतेय का? अहो तीच, तुमच्या आमच्या बालपणातली; तीन बाईक्स केल्या लाँच

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2022 13:49 IST

Yezdi Motorcycles : Classic Legends नं लाँच केलेल्या पाहा कोणत्या आहेत बाईक्स आणि किती आहे किंमत.

Yezdi Motorcycles Launch : येझदीनं तब्बल 26 वर्षांनंतर भारतीय बाजारपेठेत पुनरागमन केलं आहे. येझदीने (Yezdi) भारतात अॅडव्हेंचर, स्क्रॅम्बलर आणि रोडस्टर मोटरसायकल लाँच केल्या आहेत. येझदीच्या या नव्या बाईक्स क्लासिक लेजेंड्सच्या (Classic Legends) डीलरशीप नेटवर्कवर विक्रीसाठी उपलब्ध असतील. याद्वारे यापूर्वी JAWA बाईक्सचीही विक्री करण्यात येत आहे.

याशिवाय, कंपनीच्या वेबसाइटवर जाऊन तुम्ही या मोटरसायकल ऑनलाइन बुक करू शकता. केवळ 5 हजार रुपये भरुन तुम्हाला बाईक बुक करण्याची संधीही देण्यात आली आहे. येझदी रोडस्टर (Yezdi Roadster), स्क्रॅम्बलर (Scrambler) आणि अॅडव्हेंचर मोटरसायकल (Adventure) भारतातील रॉयल एनफिल्ड (Royal Enfield), केटीएम (KTM) आणि होंडा (Honda) यांच्या बाईक्सना टक्कर देतील.

आधुनिक तंत्रज्ञान आणि रेट्रो स्टाइल येझदी मोटरसायकलमध्ये न्यू जनरेशन लिक्विड-कूल्ड, फ्युअल इंजेक्टेड, DOHC सिंगल सिलिंडर इंजिनचा वापर करण्यात आला आहे. येझदीच्या अॅडव्हेंचर रेंजची किमत 2,09,900 रुपये, स्क्रॅम्बलर रेंजची 2,04,900 रुपये आणि रोडस्टर रेंज 1,98,142 रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) इतकी निश्चित करण्यात आली आहे.

26 वर्षांनंतर पुनरागमनYezdi, Mahindra Group ची कंपनी Classic Legends द्वारे भारतीय बाजारपेठेत आणण्यात आलेला हा तिसरा ब्रँड आहे. यापूर्वी क्लासिक लेजेंड्सनं जावा आणि बीएसए मोटरसायकल्स ब्रँड्स रिव्हाईव्ह केले होते. या तिन्ही मोटरसायकलसोबत Yezdi ब्रँडनं २६ वर्षांनी पुनरागमन केलं आहे. 1961 मध्ये भारतात पहिल्यांदा ही बाईक लाँच झाली होती. हा ब्रँड आपल्या रोडकिंग, मोनार्क आणि डिलक्स या प्रोडक्ट्ससह लोकप्रिय झाला होता. यानंतर कंपनीनं १९९६ नंतर आपल्या बाईक्सचं प्रोडक्शन बंद केलं होतं.

टॅग्स :bikeबाईकMahindraमहिंद्रा