शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

थंडीतील प्रवास, धुक्याची मजा... तेव्हा लवकर निघा, सुरक्षित जा व वेळेवर पोहोचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2017 00:05 IST

थंडीतील प्रवासाची मजा औरच. पण त्यासाठी लाँगड्राइव्हवर निघताना सुरक्षित व वेग नियंत्रित वाहनचालन हेच महत्त्वाचे असते. तेव्हा लवकर निघा व सुरक्षित जा व वेळेवर पोहोचा.

दिवाळी सुरू झाली की साधारण थंडीला सुरुवात होते, खास सुट्टी घेऊन शहरापासून काहीसे लांबवर ड्राइव्ह करण्यासाठी मन हेलकावू लागते. पावसाळ्यामध्ये जे ड्रायव्हिंग नकोसे वाटते ते थंडीच्या मोसमात मात्र हवेहवेसे वाटते. कारण हा मोसमच तसा आल्हाददायक असतो. घामाघूम व्हायला नको की, शहराबाहेर सकाळच्या प्रहरात छानपैकी मोकळी हवा घेण्याचा आनंद मात्र लुटता येतो. पम थंडीमध्ये साधारण शहरातून पहाटेच्यावेळी निघाले की आजकाल प्रदूषणाच्या धुरक्यातून बाहेर पडून नैसर्गिक धुक्यात जातो.  शहरातील वातावरणातही पहाटे अनेकदा धुके पसरते. मात्र ते धुके नसून धुरके असते. धुक्यामध्ये व धुरक्यामध्ये कार चालवताना समोरचे नीट काही दिसत नाही. तेव्हा कारचे हेडलॅम्प लावून ड्राइव्ह करणे केव्हाही श्रेयस्कर. दुसरी बाब म्हणजे शहराबाहेर मोकळ्या वातावरणात गेल्यानंतर काहीशी कमी वाहतूक असली तरी उगाचच कारचा वेग वाढवू नका, सावधपणे कार चालवा. कारण धुक्यामध्ये वा सकाळच्या वेळेत शहराबाहेरच्या परिसरात अनेकजण सकाळी चालायला, वा आपापल्या दैनंदिन कामासाठी बाहेर पडलेले असतात. स्कूटर्स,मोटारसायकल यांचीही काहीशी रेलचेल सुरू झालेली असते. मात्र धुके असल्यास या साऱ्यांची जाण ठेवून सावधपणे कार चालवणे महत्त्वाचे आहे.साधारण शहराबाहेर पडल्यानंतर दोन तासानंतर उन्हाचा उष्मा जाणवायला लागतो. अशावेळी थोडी विश्रांती घ्या व मग त्या हवेला. वातावरणाला जुळवून घेतल्यानंतर पुढच्या प्रवासाला लागा. अजूनही पावसानंतर अनेक रस्त्यांमधील खड्डे कायम असतात. त्यामुळे खड्डे पाहून गाडी चालवा, अन्यथा काहीवेळा खड्ड्यांचा अंदाज न आल्याने गाडी आपटण्याची शक्यता असते. उन्हाळ्यामध्ये कार चालवणे तसे तापदायक असते मात्र थंडीच्या मोसमात हा ताप सहन करावा लागत नाही, हे खरे असले तरी दुपारी ११ नंतर उन हळूहळू कडक वाटू लागते,अशावेळी गॉगल लावून कार चालवणे श्रेयस्कर असते. शहरी वातावरणात व शहराबाहेरच्या वातावरणात, तेथील वाहतुकीमध्ये, वाहन चालवण्याच्या पद्धतीमध्ये फरक असतो, हे ध्यानात असायला हवे. तशात अनेकांचे असे होते, की खूप दिवसांनी लाँगड्राइव्हला बाहेर पडल्याने वारा प्यायल्यासारखी गाडी चालवतात. तसे करू नका. कारण तुम्ही गाडी चालवणे हे इतरांच्यादृष्टीने घातक ठरू शकते. तेव्हा वेग नियंत्रण हे ठेवायला हवे.धुक्याचे वातावरण असेल तेव्हा अनेकदा कारच्या विंडशील्डवर म्हणजे समोरच्या काचेवर आतील बाजूनेही दमटपणा येतो, त्यामुळे काटा उघडल्या नसतील तर एसीचा गारवाही त्रासदायक वाटू नये म्हणून तो किमान ठेवा व त्याचा थंडा झोत समोरच्या काचेवर आतील बाजूने लागेल इतका ठेवा. त्यामुळे तुम्हाला समोरचे स्पष्ट दिसू शकेल. अनेकदा वायपरही वापरावा लागतो. पण त्यावेळी पाणी मारून वायपर वापरीत राहा. धुके विरल्यानंतर हेडलॅम्प बंद करायला विसरू नका. थंडीच्या दिवसामध्ये काहीवेळा गारव्यामुळे झोप लागण्याची वा डुलकी लागण्याचीही शक्यता असते. त्यामुळे ते टाळा, तोंडावर वाटल्यास पाण्याचा हबकारा मारा. तसेच पहाटे निघणार असल्यास आदल्या दिवशी रात्री लवकर झोपा, झोप पुरेशी झाल्यानंतरच ड्रायव्हरच्या आसनावर बसा. तुमच्याबरोबरही तुमचे कुटुंब, मित्र असतात. त्यामुळे त्यांची सुरक्षितता ही तुमच्या नेतृत्त्वावर अवलंबून असते हे लक्षात ठेवा.लांबच्या प्रवासाला जाण्यापूर्वी नेहमीप्रमाणे कूलन्टची लेव्हल, सर्व ऑइलची लेव्हल, ब्रेक्स, हेडलॅम्प आदींची तपासणीही करा. टायरची हवा किमान ठेवा. लांबच्या प्रवासात सुरुवातीला जास्त हवा भरल्यास नंतर ती वाढणार असते, त्यामुळे टायरची हवा योग्य व किमान दाबाची भरून घ्या. रात्रीचा प्रवास करतानाही पहाटेच्यावेळी साधारण रात्री २ नंतर धुके जमायला काही ठिकाणी सुरुवात होते. त्यामुळे गाडीला फॉग लाइट नसल्यास हरकत नाही, मात्र तेव्हा अतिशय दक्षतेने ड्राइव्ह करा. सुरक्षित व सावध वेग नियंत्रणातील ड्रायव्हिंग हे महत्त्वाचे. तेव्हा लवकर निघा व वेळेवर पोहोचा.

टॅग्स :carकार