शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

‘टेस्ला’ला हवी तिथे जागा देऊ , इतर राज्यांपेक्षा अधिक सवलतीही देणार; महाराष्ट्र सरकारची मोठी ऑफर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2023 07:00 IST

भारतात ईव्ही निर्मितीचा कारखाना उभारण्यासाठी टेस्ला जागा शोधत असल्याचे वृत्त आहे. यापूर्वी भारतात प्रकल्प सुरू करण्यासाठी टेस्लाने आयात शुल्क कपातीची अट ठेवली हाेती.

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : इलेक्ट्रिक वाहन निर्मितीत जगात अग्रेसर असलेल्या टेस्ला कंपनीला वाहन निर्मितीचा कारखाना उभारण्यासाठी महाराष्ट्रात कुठेही जागा हवी असेल तर ती उपलब्ध करून दिली जाईल, असे राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले आहे. राज्यात मोठे उद्योग यावेत ही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह आमच्या सर्वांची भावना आहे. त्यासाठी अशा मोठ्या उद्योगांना इतर राज्यांपेक्षा जादा सवलती देण्यासाठी महाराष्ट्र तयार असल्याचेही सामंत यांनी सांगितले. 

भारतात ईव्ही निर्मितीचा कारखाना उभारण्यासाठी टेस्ला जागा शोधत असल्याचे वृत्त आहे. यापूर्वी भारतात प्रकल्प सुरू करण्यासाठी टेस्लाने आयात शुल्क कपातीची अट ठेवली हाेती. मात्र केंद्र सरकारने त्यास नकार दिल्यामुळे हा निर्णय टेस्लाने स्थगित  केला होता. 

आता भारतात प्रकल्प उभारण्याच्या हालचाली टेस्लाने पुन्हा सुरू केल्याची चर्चा आहे. त्याबाबत मंत्री सामंत यांना विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना या प्रकल्पासाठी महाराष्ट्र सरकार जादा सवलती देण्यास तयार असल्याचे म्हटले आहे. 

केंद्र सरकारने ठेवली हाेती ‘ही’ अटn केंद्र सरकारने टेस्लाला भारतात ईव्ही वाहने विकायची असतील तर त्यांना देशातच प्रकल्प उभारावा लागेल, असा सल्लाही दिला होता. n त्यानंतर आता टेस्लाचे प्रमुख एलॉन मस्क यांनी सरकारसोबत संपर्क साधला असून, भारतात प्रकल्प सुरू करण्यासाठी स्वारस्य दाखविल्याची चर्चा आहे. 

महाराष्ट्राला संधीराज्यातील काही प्रस्तावित उद्योग बाहेर गेल्याने शिंदे-फडणवीस सरकारवर टीका होत आहे. त्यात टेस्लाचा प्रकल्प महाराष्ट्रात आला तर या सरकारसाठी उपलब्धी असेल.

टॅग्स :Teslaटेस्लाUday Samantउदय सामंत