शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
5
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
6
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
7
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
8
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
9
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
10
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
11
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
12
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
13
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
14
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
15
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
16
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
17
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
18
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
19
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
20
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा

अपघात झाला तरी Airbag उघडत का नाही? वाहनचालकांनो तुमचीच चुकी? कशी जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2021 14:47 IST

Car Airbag not open: एअरबॅगचे काम असे असते की अपघात झाला की कारचालकाचे डोके समोरच्या भागावर आदळू नये. ते आदळण्याआधीच सेन्सरव्दारे बॅग उघडते आणि ती चालकाच्या डोक्याच्या आणि स्टेअरिंगच्या मध्ये येते. यामुळे दुखपतीपासून वाचायला होते. पण ही एअरबॅगच जर उघडली नाही तर मग कपाळमोक्ष ठरलेला असतो. 

भारतात आता कारमध्ये दोन एअरबॅग बंधनकारक केले आहेत. नवीन गाड्यांमध्ये ड्रायव्हरसह शेजारच्या पॅसेंजरलाही एअरबॅगची सुरक्षा देण्यासाठी केंद्र सरकारने पाऊले उचलली आहेत. आपल्याकडे काही कारमध्ये सहा एअरबॅगही देण्यात येतात. मात्र, अनेकदा आपण ऐकतो की अपघात झाला पण एअरबॅगच उघडली नाही, कंपन्यांनी फसविलेपासून ते कारमध्ये फॉल्ट असल्याचे ठोकताळे बांधले जातात. मात्र एअरबॅग न उघडण्याची काही कारणे आहेत. 

एअरबॅगचे काम असे असते की अपघात झाला की कारचालकाचे डोके समोरच्या भागावर आदळू नये. ते आदळण्याआधीच सेन्सरव्दारे बॅग उघडते आणि ती चालकाच्या डोक्याच्या आणि स्टेअरिंगच्या मध्ये येते. यामुळे दुखपतीपासून वाचायला होते. पण ही एअरबॅगच जर उघडली नाही तर मग कपाळमोक्ष ठरलेला असतो. 

ज्या प्रकारे तुम्ही काही महिन्यांनी तुमची कार सर्व्हिसिंगक करून घेता, तशीच एअरबॅगलाही सर्व्हिसिंगची गरज असते. जर कारमधील एअरबॅगची काळजी घेतली नाही तर काही वर्षांनी ती खराब होते. यामुळे जेव्हा गरज भासते तेव्हा ती योग्य प्रकारे उघडते असे नाही. अनेकदा अशा कारमधील एअरबॅग उघडत नाहीत. या एअरबॅगचे सेन्सर चालू आहेत का, या सारख्या गोष्टी तपासण्याची गरज असते.  

प्रोटेक्टिव ग्रिलआजकाल कारमध्ये प्रोटेक्टिव्ह ग्रील लावले जाते. अनेकजण कारचे नुकसान होऊ  नये म्हणून गार्ड लावतात. यामुळे अनेकदा अपघातावेळी एअरबॅग उघडत नाही. या गार्डमुळे पुढच्या सेन्सरला कळतच नाही की अपघात झाला आहे. समोरून आदळणारे वाहन किंवा वस्तू त्या सेन्सरला टच न झाल्याने एअरबॅग उघडत नाही मात्र, आदळण्याचा दणका आतमध्ये बसलेल्यांना बसतो. 

खराब एअरबॅगकंपन्या नव्या कारमध्ये एअरबॅग देतात खऱ्या, परंतू त्या सुस्थितीत असतात की खराब ते अनेकदा कळत नाही. ते समजण्यासाठी आपली गाडी तर कशावर कोणी आदळणार नाही. यामुळे अपाघात होताच एअरबॅग सुस्थितीत असेल तर उघडेल नाहीतर ती जाम होईल. यामुळे एअरबॅगची तपासणी गरजेची आहे. 

बनावट एअरबॅगअनेक कारमध्ये एकच एअरबॅग असते. यामुळे मॉडेलमध्ये पैसे वाचवून कार घेतल्यानंतर अनेकजण बाहेरून एअरबॅग बसवून घेतात. ही एअरबॅग स्वस्तच असते. म्हणजेच बनावट.  ही एअरबॅग त्या पद्धतीने काम करत नाही ज्या पद्धतीने ओरिजनल एअरबॅग काम करते. यामुळे नेहमी चांगल्या प्रतीची एअरबॅग खरेदी करावी. 

टॅग्स :carकारroad safetyरस्ते सुरक्षाAccidentअपघात