रोल्स रॉयसची लक्झरी कार घेण्याचे करोडोंच्या नशिबात नसते. तशी ही कार फार रस्त्यांवरही दिसत नाही. अगदीच सांगायचे म्हणजे या कंपनीच्या शोरुममध्ये मध्यम वर्गीयांनाच नाही तर भल्या भल्यांनाही उभे केले जात नाही. एखाद्याकडे कितीही संपत्ती असो, त्याची 'लायकी' नसली तर ही कंपनी त्याला कार विकत नाही. एवढेच नाही तर इतर गाड्यांप्रमाणे या कंपनीच्या कारची नावेही नसतात. हे चक्क भुतांची नावे कारना देतात.
इतर कंपन्यांनी असे केले तर त्या कारकडे कोणी फिरकणारही नाही. परंतू, या कारकडे लोकांचे डोळे गरागरा फिरत असतात. रोल्स रॉयस नेहमी ऐतिहासिक आत्मे, जुने प्राणी किंवा खगोलिय पिंडाची नावे देते. कंपनीने सिल्ह्वर घोस्ट, फँटम अशी नावे आपल्या कारना दिलेली आहेत. सिल्ह्वर घोस्ट म्हणजे कार नाही तर विलासिता आणि कला यांचा पुढच्या स्तरावर नेणारा अनुभव होता.
रोल्स-रॉइस मोटार गाड्यांची नावे आत्मे किंवा अलौकिक घटकांवरून ठेवली जातात यामुळे या कारना एकप्रकारच्या गुढतेचे वलय मिळते. कंपनीच्या गाड्यांना इतर ब्रँडच्या गाड्यांपेक्षा वेगळी ओळख देणे हाच त्यामागचा एकमेव उद्देश आहे. अशा प्रकारच्या नावांमुळे कंपनीच्या कारना वेगळी ओळख मिळत गेली. यामुळेच या कार नुसत्या रोल्स रॉयस नाही तर त्यांच्या नावावरून भारदस्त वाटू लागल्या आणि लोकांना आवडू लागल्या होत्या.
शोरुममधून बाहेर हाकलले जाते...रोल्स रॉयस ही अशी कार कंपनी आहे, जिथे एखादा सामान्य व्यक्ती गेला तर त्याला शोरुममधून बाहेर जाण्यास सांगितले जाते. कारण तिथे फक्त श्रीमंतच नाही तर भारदस्त व्यक्तींनाच कार विकली जाते. जसे की एखादा मोठा अॅक्टर, नेता किंवा उद्योजक ज्याच्या नावाची चांगली चर्चा, प्रतिमा तयार झालेली असते. यामुळे तिथे काळ्या पैसे वाले किंवा किती पैसा असला तरी ते गर्भश्रीमंत लोक ही कार घेऊ शकत नाहीत. तसेच ज्यांना ही कार विकत घेता येते, ते ती कार सेकंड हँड बाजारातही विकू शकत नाहीत. ती कंपनीलाच परत करावी लागते, असे सांगितले जाते.