शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

कुणाची ‘ईव्ही’ अधिक स्वस्त? दिग्गज कंपन्या लाँच करणार नवी मॉडेल्स, ग्राहकांची होणार चंगळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2024 07:03 IST

प्रदूषणमुक्त प्रवास यापुढे परवडणाऱ्या खर्चात शक्य असल्याने लोकांचा कल ईव्ही कार घेण्याकडे असणार आहे.

नवी दिल्ली : सरकारने दिलेले प्रोत्साहन, जाहीर केलेल्या विविध सवलती यामुळे जगभरातील दिग्गज कंपन्या भारतात ईव्ही प्रकल्प सुरू करीत आहेत. या वाहनांमध्ये  लागणाऱ्या बॅटरी स्वस्त झाल्याने उत्तरोत्तर ही स्वस्त होणार आहेत. 

प्रदूषणमुक्त प्रवास यापुढे परवडणाऱ्या खर्चात शक्य असल्याने लोकांचा कल ईव्ही कार घेण्याकडे असणार आहे. यामुळे मारुती सुझुकी, ह्युंदाई, महिंद्रा अँड महिंद्रा तसेच टाटा मोटर्ससारख्या मोठ्या कंपन्या या वर्षात विविध प्रकारातील ईव्ही मॉडेल बाजारात आणणार आहेत. स्वत:च्या मालकीची कार असावी, असे स्वप्न उराशी बाळगणाऱ्यांसमोर यंदा अनेक पर्याय उपलब्ध असतील. (वृत्तसंस्था) 

मर्सिडिज बेंझ : तीन नव्या बीईव्ही आणणारलक्झरी वाहन कंपनी मर्सिडिज बेंझ इंडियाच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, २०२४ मध्ये कंपनी बाजारात १२ नव्या गाड्या सादर करणार आहे. यात तीन बॅटरी इलेक्ट्रिक वाहनांचा (बीईव्ही)  समावेश असेल.

महिंद्रा : वाटा ३० टक्के पर्यंत नेण्याचा संकल्पमहिंद्रा अँड महिंद्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी नलिनीकांत गोलागुंटा यांनी सांगितले की, कंपनी पुढील पाच वर्षात बाजारात ई वाहने लाँच करणार आहे. जानेवारी २०२५ पासून कंपनीचे हे अभियान सुरू होईल. इलेक्ट्रिक एसयूव्हीची अभिनव मॉडेल्स कंपनी आणणार आहे. २०२७ पर्यंत इलेक्ट्रिक एसयूव्ही बाजारात आमच्या कंपनीचा हिस्सा २० ते ३० टक्के असेल, या उद्देशाने आम्ही प्रयत्न करीत आहोत. 

मारुती सुझुकी : ६ नवी मॉडेल्स मारुती सुझुकीचे कॉर्पोरेट विभागाचे कार्यकारी अधिकारी राहुल भारती यांनी सांगितले की, पुढील सात ते आठ वर्षात कंपनी ६ इलेक्ट्रिक वाहने लाँच करणार आहे. आता हायब्रीड इलेक्ट्रिक, सीएनजी, बायो-सीएनजी, इथेनॉल, इथेनॉल फ्लेक्स फ्युअल आदींना महत्त्व येईल. कंपनी या तंत्रज्ञानावर लक्ष केंद्रित करणार आहे. 

टाटा मोटर्स : चार नवी  मॉडेल्स लाँच करणारटाटा मोटर्सच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, २०२६ पर्यंत कंपनीच्या बाजारातील ई वाहनांची संख्या १० वर पोहोचली असेल. कंपनी कर्व आणि हॅरिअर ईव्हीसह आणखी चार मॉडेल्स आणण्याच्या विचारात आहे. कंपनीने सध्याही ईव्हीचे अनेक पर्याय बाजारात उपलब्ध करून दिलेले आहेत. 

ह्युंदाई : २६ हजार कोटींचा प्रकल्प ह्युंदाई मोटर इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तरुण गर्ग यांना सांगितले की, मागच्या वर्षी प्रीमियम इलेक्ट्रिक एसयूव्ही आयओएनआयक्यू-५ सादर केली होती. आम्हाला विश्वास आहे की, २०३० पर्यंत बाजारात ईव्हींचा वाटा जवळपास २० टक्के इतका असेल. पुढील १० वर्षात कंपनी तामिळनाडूमधील प्रकल्पात २६ हजार कोटींची गुंतवणूक करणार आहे. या ठिकाणी बॅटरी असेम्ब्लिंगचे युनिटही असणार आहे.  

टॅग्स :Automobileवाहनbusinessव्यवसाय