शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
3
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
4
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
5
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
6
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
7
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
8
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
9
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
10
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
11
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
12
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
13
लेख: वीस हजार बेवारस चपलांना नव्या झिंगाट नशेचं व्यसन !
14
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
15
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
16
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
17
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
18
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
19
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
20
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!

Alto, Wagon R किंवा Baleno नाही, तर 'ही' आहे सर्वाधिक विकली जाणारी कार, मायलेज 30KM पेक्षा जास्त 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2023 18:23 IST

सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारच्या यादीत बलेनो दुसऱ्या क्रमांकावर, वॅगनआर आठव्या क्रमांकावर आणि अल्टो वीसव्या क्रमांकावर आहे.

नवी दिल्ली : भारतात सर्वाधिक विक्री होणारी कार कोणती? असे विचारल्यावर सहसा बरेच लोक याचे उत्तर अल्टो, वॅगनआर किंवा बलेनोचे नाव घेताना दिसतील. कारण या तिन्ही कार वेगवेगळ्या महिन्यांत सर्वाधिक विकल्या गेल्या आहेत. परंतु, जुलै २०२३ च्या शेवटच्या महिन्यात असे घडले नाही. जुलै महिन्यात मारुती सुझुकी स्विफ्टची सर्वाधिक विक्री झाली आहे. तसेच, सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारच्या यादीत बलेनो दुसऱ्या क्रमांकावर, वॅगनआर आठव्या क्रमांकावर आणि अल्टो वीसव्या क्रमांकावर आहे.

मारुती सुझुकी स्विफ्टने जुलै २०२३ मध्ये १७,८९६ युनिट्सची विक्री केली आहे, तर गेल्या वर्षी (२०२२) जुलै महिन्यात एकूण १७, ५३९ युनिट्सची विक्री झाली होती. म्हणजेच विक्रीत वाढ झाली पण फारशी नाही. वार्षिक आधारावर कारची विक्री केवळ २ टक्क्यांनी वाढली आहे. याव्यतिरिक्त, जुलै २०२३ मध्ये, बलेनोच्या १६,७२५ युनिट्स, वॅगनआरच्या १२,९७० युनिट्स आणि अल्टोच्या ७,०९९ युनिट्सची विक्री झाली.

सर्वात विक्री झालेल्या १० कारमारुती स्विफ्ट -  १७,८९६ युनिट्स विक्रीमारुती बलेनो - १६,७२५ युनिट्स विक्रीमारुती ब्रेझा - १६,५४३ युनिट्स विक्रीमारुती एर्टिगा - १४,३५२ युनिट्स विक्रीह्युंदाई क्रेटा - १४,०६२ युनिट्स विक्रीमारुती डिझायर - १३,३९५ युनिट्स विक्रीमारुती फ्रॉन्क्स - १३,२२० युनिट्स विक्रीमारुती वॅगनआर - १२,९७० युनिट्स विक्रीमारुती नेक्सॉन - १२,३४९ युनिट्स विक्रीमारुती ईको - १२,०३७ युनिट्स विक्री

किंमत किती?मारुती स्विफ्टची किंमत ५.९९ लाख रुपये ते ९.०३ लाख रुपये (एक्स-शोरूम) पर्यंत आहे. यात १.२ लीटर ड्युअलजेट पेट्रोल इंजिन आहे. हे इंजिन पेट्रोलवर २३.७६ kmpl आणि सीएनजीवर ३०.९० kmpl पर्यंत मायलेज देते. यात इंजिनसह ५-स्पीड मॅन्युअल आणि AMT गिअरबॉक्सचा पर्याय मिळतो. 

टॅग्स :MarutiमारुतीMaruti Suzukiमारुती सुझुकीcarकार