शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत, माहिम स्थानकात पॉइंट बिघाड; फास्ट ट्रॅकवरील लोकल उशीराने
2
'काम करु नका, मुले जन्माला घाला'! लोकसंख्या वाढीसाठी 'या' देशाने काढले फर्मान
3
राजा रघुवंशी हत्याकांडावर सीमा हैदरच्या वकिलांचं मोठं विधान, म्हणाले - 'इस्लाम धर्मात...!'
4
सुप्रिया सुळेंनी पंतप्रधान मोदींना भेट दिली दोन खास पुस्तकं, काय आहेत नावं?
5
"खाने के लाले, लडने में सबसे आगे...!" रडत-पडत कर्ज मिळवलं अन् संरक्षण बजेट २०% नं वाढवलं; दहशतवाद पोसणाऱ्या PAK चा खरा चेहरा समोर
6
Video: 'ऑपरेशन सिंदूर'दरम्यान दाखवले मोठे शौर्य; इंडिगोच्या विमानात BSF जवानाचा सन्मान
7
Covid Cases: कोरोना वाढतोय! पंतप्रधान मोदींना भेटण्याआधी मंत्री, नेत्यांना RT-PCR चाचणी सक्तीची
8
मुलाचा मृत्यू झाल्यावर वडिलांनी मृतदेहासोबत पुरली बाईक; मन हेलावून टाकणारी घटना
9
नारकरांच्या लेकाची गर्लफ्रेंडसोबत डेट, बांद्रामध्ये मारला फेरफटका; प्रेमाने तिला म्हणाला...
10
Sonam Raghuvanshi : राजाच्या हत्येचा प्लॅन अयशस्वी झाला असता तर काय करणार होती सोनम? बॅकअप प्लॅन तयार
11
ऐरोली स्थानकाजवळ चायनीजच्या गाडीत सिलिंडरचा स्फोट, थरारक घटनेचा व्हिडिओ समोर!
12
...तर प्रवाशांनी खच्चून भरलेली ट्रेन दगड, मातीत गाडली जाईल
13
५ मे रोजी लग्न, २५ ला हनिमून, २९ ला अपघात... बेपत्ता कपलचा गेल्या १३ दिवसांपासून शोध सुरू
14
ट्रेन प्रवासाची चिंता मिटली! आता २४ तास आधीच मिळेल कन्फर्म सीटची अपडेट, कधीपासून लागू होणार?
15
Astrology: प्रेम होणे, प्रेमभंग होणे आणि प्रेमविवाह यशस्वी होणे याचेही पत्रिकेत विशिष्ट योग असतात!
16
कुणाल कपूरच्या गुड लूक्सवर चाहते फिदा, 'रामायण'च्या सेटवरचा फोटो केला शेअर? चाहते म्हणाले...
17
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
18
आजचा अग्रलेख: हे पवार, ते पवार आणि 'पॉवर'
19
एक गेली आता दुसरी आली! श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील संघाला ट्रॉफी जिंकण्याची संधी
20
अवघ्या ९० चेंडूत १९० धावा! पुन्हा एकदा वैभव सूर्यवंशीची बॅट तळपली, गोलंदाजांना फुटला घाम

इथेनॉल मिश्रित पेट्रोल E-20 वापरून तुमचे नवीन किंवा जुने वाहन किती मायलेज देईल? जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2023 16:20 IST

ethanol mixed petrol : येत्या 2 वर्षात इथेनॉल मिश्रित पेट्रोलची देशभरात विक्री सुरू करण्याचे मोदी सरकारचे उद्दिष्ट आहे.

नवी दिल्ली : जैविक इंधनाच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी मोदी सरकारने देशात इथेनॉल मिश्रित पेट्रोल (Ethanol Mixed Petrol) ई-20 (E-20) ची विक्री सुरू केली आहे. गेल्या सोमवारपासून देशातील 11 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये इथेनॉल मिश्रित पेट्रोलची विक्री सुरू झाली आहे. पहिल्या टप्प्यात दिल्ली-एनसीआरसह देशातील 15 शहरांमध्ये याची अंमलबजावणी करण्यात आली आहे.

येत्या 2 वर्षात इथेनॉल मिश्रित पेट्रोलची देशभरात विक्री सुरू करण्याचे मोदी सरकारचे उद्दिष्ट आहे. रिलायन्स आणि बीपी यांच्या संयुक्त उपक्रमाने इथेनॉल मिश्रित पेट्रोलचे नाव E-20 पेट्रोल ठेवले आहे. इथेनॉल मिश्रित असलेले पेट्रोल बीएस-4 ते बीएस-6 टप्प्यापर्यंतच्या सर्व वाहनांमध्ये वापरले जाऊ शकते. या पेट्रोलच्या वापरामुळे वाहनांच्या मायलेजवर आणि पेट्रोलच्या किमतीवर काय परिणाम होईल, याबाबत जाणून घ्या...

सोमवारी E-20 चे लॉन्चिंग करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, उद्दिष्टाच्या अगोदर E-20 ची अंमलबजावणी केली जात आहे. 2014 मध्ये पेट्रोलमध्ये इथेनॉलचे मिश्रण 1.5 टक्क्यांवरून 10 टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आले. पेट्रोलमध्ये 10 टक्के इथेनॉल मिसळल्याने देशाची दरवर्षी 53 हजार 894 कोटी रुपयांची बचत होते. इथेनॉलच्या वाढत्या वापराचा फायदा शेतकऱ्यांनाही होतो.

इथेनॉल मिश्रित पेट्रोलचे फायदेआता केंद्र सरकारने इथेनॉल मिश्रित पेट्रोल 10 टक्क्यांवरून 20 टक्के केले आहे. सध्या देशातील 15 शहरांमधील 84 पेट्रोल पंपांवर ही सुविधा उपलब्ध आहे. केंद्र सरकारने यापूर्वीच वाहन उत्पादक कंपन्यांना E-20 इंजिन तयार करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे आजपर्यंत पेट्रोलसोबत इथेनॉल मिश्रित वापरताना कोणतीही अडचण आल्याची तक्रार नाही.

मोदी सरकारची काय आहेत तीन उद्दिष्टे विशेष म्हणजे इथेनॉल मिश्रित पेट्रोलच्या वापराबाबत मोदी सरकारने अनेक उद्दिष्टे निश्चित केली आहेत. पहिले म्हणजे पेट्रोलची आयात कमी करणे, दुसरे म्हणजे दिल्ली-एनसीआरसह देशातील मोठ्या शहरांमधील प्रदूषण कमी करणे आणि तिसरे म्हणजे ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करणे. दरम्यान, आपल्या माहितीसाठी इथेनॉल उसापासून तयार होते. देशातील अनेक राज्यांमध्ये उसाची मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्नही वाढणार आहे.

मायलेजसह मिळेल अधिक पॉवरदरम्यान, इथेनॉल मिश्रित पेट्रोल E-20 ची विक्री सुरू झाली असली तर अद्याप पेट्रोलचे दर कमी होणार नसल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. तसेच, पेट्रोलवर केंद्र आणि राज्य सरकार एकत्र केले तर कराचा बोजा सुमारे 52 टक्के आहे. मात्र, इथेनॉलवरील कर अजूनही कमी आहे. याचबरोबर, तुम्हाला E-20 इंधनामुळे चांगल्या मायलेजसह अधिक पॉवर मिळेल. परंतु, जुन्या इंजिन असलेल्या वाहनांमध्ये E-20 पेट्रोल टाकल्यास कमी मायलेज आणि कमी पॉवर मिळण्याची शक्यता असते.

टॅग्स :AutomobileवाहनPetrolपेट्रोल