शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

ड्रायव्हर म्हणतोय टायर फुटला, पोलीस म्हणतायत ड्रायव्हर झोपला; रोड हिप्नॉटिझम म्हणजे काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2023 13:22 IST

Buldhana Bus Accident, road hypnosis Samruddhi Highway: रोड हिप्नॉटिझम म्हणजे काय? दिवस असो की रात्र ड्रायव्हर बनतात शिकार; बस अपघाताचे निमित्त...

अनेकदा वाहनचालकांना रोड हिप्नॉटिझमला सामोरे जावे लागते. अनेकदा तुमच्याही लक्षात आले असेल, दूरचा प्रवास करून आल्यावर आपण इथे कसे आलो, हे आठवत नाही. किंवा वाहन चालवत असताना बेधुंद म्हणजेच नजर शून्यात गेल्यासारखे वाटते आणि आपण वाहन चालवत राहतो. इथे धोका खरा आहे, लक्षात घ्या. यामुळे रोड हिप्नॉटिझम म्हणजे काय ते जाणून घ्या आणि त्यापासून कसे वाचावे हे देखील पहा...

ड्रायव्हर, क्लिनरला साधे खरचटलेही नाही; महाजनांनी सांगितले बुलढाणा अपघाताचे कारण

टाटाच्या कारमध्ये एक फिचर आहे. काही ठराविक वेळ सलग गाडी चालविली की टाटाच्या स्क्रीनवर एक विश्रांती घेण्याचा सल्लावजा मेसेज येतो. इतरही गाड्यांमध्ये असेल हे, परंतू हे काय आहे. तर परदेशात प्रचलित असलेल्या रोड हिप्नॉटिझम स्थितीपासून वाचण्यासाठी हा मेसेज असतो. सतत गाडी चालवून आपल्याला आपल्य़ा समोर चलचित्र पाहिल्यासारखे होते. यात आपण गुरफटून जातो आणि पुढे अपघाताची शक्यता असते. काय प्रकार असतो हा? 

रोड संमोहन म्हणजे नेमके काय?रोड संमोहन ही एक शारीरिक स्थिती आहे जी बहुतेक ड्रायव्हर्सना लक्षात येत नाही किंवा त्यांना माहिती नसते. रोड हिप्नोसिस रस्त्यावर वाहन चालविण्यास सुरुवात केल्यानंतर 2.5 तासांनी सुरू होते, संमोहित चालकाचे डोळे उघडे असतात, परंतु मेंदू जे काही पाहतो ते रेकॉर्ड आणि विश्लेषण करत नाही. रोड संमोहन हे तुमच्या समोर उभ्या असलेल्या वाहनाला किंवा ट्रकला मागील बाजूस अपघात होण्याचे पहिले कारण आहे. रोड हिप्नोसिस असलेल्या ड्रायव्हरला टक्कर होईपर्यंत शेवटच्या 15 मिनिटांत काहीही आठवत नाही. तो किती किमी वेगाने जात आहे, किंवा त्याच्या समोरच्या कारचा वेग, सहसा टक्कर 140 किमीच्या वर असते याचे विश्लेषण करू शकत नाही.

कसे वाचावे...रोड हिप्नोसिसपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी, दर 2.5 तासांनी थांबणे, चालणे, चहा किंवा कॉफी पिणे आवश्यक आहे. लांब रस्त्यावर रोड संमोहनपूर्वी काही काळ चलचित्र बघितल्या सारखे वाटून नुसते बघत रहातो. तुमच्यासोबतही हा प्रकार अनेकदा घडला असेल. याला झोप किंवा डुलकी म्हणत नाहीत. असे प्रकार हायवेवर होतात, कारण सगळीकडे रस्ता सारखाच असतो.

काय़ काळजी घ्यावी?वाहन चालवताना काही ठिकाणे आणि वाहने लक्षात ठेवणे आवश्यक आहे. जर तुम्हाला शेवटच्या 15 मिनिटांत काहीही आठवत नसेल, तर याचा अर्थ तुम्ही स्वत:ला आणि प्रवाशांना मृत्यूकडे नेत आहात. रोड संमोहन रात्रीच्या वेळी अधिक वेळा घडते आणि प्रवासी देखील झोपलेले असल्यास, परिस्थिती खूप गंभीर होते. चालकाने थांबावे, विश्रांती घ्यावी, दर 2.5 तासांनी 5-6 मिनिटे चालावे आणि आपले मन मोकळे ठेवावे.

डोळे उघडे असले तरी जर का मन बंद असेल तर अपघात अटळ आहे. गाडी चालवता चावलता ब्लँक होणे थांबवा, क्षणभर गाडी बाजूला घेऊन दीर्घ श्वास घ्या आणि फ्रेश होऊन इकडे तिकडे बघत परत ताजेतवाने होत वाहन चालविण्यास सुरुवात करा. थांबल्याने वेळ जातो, म्हणून दुर्लक्ष करू नका. न जाणो यामुळे तुम्ही ती वेळ टाळू शकाल.

टॅग्स :AccidentअपघातbuldhanaबुलडाणाSamruddhi Mahamargसमृद्धी महामार्ग